पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. पूर्णलक्ष छाती - श्वास याकडे न देता घाईगर्दीने झटपट सूर्यनमस्कार घातले तर हा त्रास होतो. मन एकाग्र करून पंजावर दिलेला दाब हातातून छातीपर्यंत सरकत नाही म्हणून हा त्रास होतो. ज्या ठिकाणी दाब अडकतो (दिलेला दाब पुढे सरकत नाही) त्या भागातले स्नायू त्रास देतात. सावधान - आपल्या शरीर क्षमतेप्रमाणे या आसनातील उच्चतम स्थिती घ्या. थोडं थांबा. स्नायूंवर दिलेला दाब कमी करण्यास सुरुवात करा. कोणते स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. ज्या स्नायूंचा सहभाग या आसनामध्ये केलेला नाही ते स्नायू ताणमुक्त होत असतील तर त्या ठिकाणी स्नायूंचे दुखणे सुरू होणार हे निश्चित. ही चूक दोन चार वेळा झाल्यास ते स्नायू दिवसभर ठणकणार. हेच आसन पुन्हा करतांना चूक होणार नाही याची काळजी घ्या. काहींना हे आसन अवघड वाटत असल्यास तिसरा प्रकार प्रथम काही दिवस करा किंवा तेही जमत नसेल तर फक्त मुद्रा स्थितीमध्ये उभे राहा. 9 ७ वायू ॐ, नाद ॐ, नाडीशोधन प्राणायाम यातील कौशल्याचा उपयोग यामध्ये होतो. हे प्रकार अधिक लक्षपूर्वक करा. फारच त्रास होत असल्यास एक/ दोन दिवस हे आसन करू नका. सूर्यमंत्र - ॐ रवयेनमः - आसनाचा उद्देश आसनाच्या नावाप्रमाणेच हात डोक्यावर उंच उचलणे. संपूर्ण शरीराला वरच्या दिशेला ताण देणे. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करणे. 9 • श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचे वाचन करतांना श्वासाकडे लक्ष देऊन एक एक ओवी संपूर्णपणे वाचावी. दीर्घ श्वसनाचे सर्व फायदे मिळतात. हाच नियम जपसाधना करतांना पाळावा. सूर्यनमस्कार एक साधना ९२