पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न तिसरा हे आसन अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही हातांचा उपयोग तरफे सारखा करावयाचा आहे. अनाहत चक्राकडे लक्ष द्या. श्वास झटपट सोडा. हात एकदम दाबा. दाब मोकळा करा, श्वास घ्या. छाती विस्फारल्याची संवेदना स्वीकारा. आणखी दोन वेळा ही क्रिया करा. आरामात उभे राहा. प्रणामासनातील कौशल्य प्रथम कौशल्य आसन दिसायला सोपे आहे. पण कृती करतांना त्यातील अवघडपणा लक्षात येतो. म्हणून काही संप्रदायामध्ये ही कृती आसन म्हणून न करता मुद्रा म्हणून करतात. नमस्कार मुद्रा करतांना शरीर ताण- दाब रहित ठेवणे, एकाग्र होऊन सूर्यनारायणाचे अधीन होणे एवढेच अपेक्षित आहे. - द्वितीय कौशल्य या आसनातील दुसरे कौशल्य आहे अनाहत चक्राकडे संपूर्ण लक्ष देऊन या आसनामधील सर्व क्रिया क्रमाने करणे. - तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) अनाहत चक्रापासून जमिनीवर दोन पावलांमध्ये लंबरेषेत ठेवा. हे आसन करतांना सुरुवातीला खांदे-मान- हात यांचे स्नायू ताण रहीत करणे, अनाहत चक्राकडे मन एकाग्र करणे आणि या आसनातील सर्व क्रिया क्रमाने श्वास सोडत करणे. जीभ टाळूला लावा, दृष्टी सूर्याकडे लक्ष डोक्यावरील टाळूकडे, अनुभूती शरीर उंच झाल्याची जाणीव. या पहिल्या आसनापासून प्राणतत्त्वाचा स्वीकार अधिक प्रमाणात घेण्याची प्रक्रिया सुरु करायची आहे. पहिल्या कौशल्याचा चांगला सराव झाल्यावर दुसऱ्या व नंतर तिसऱ्या कौशल्याकडे वळा. तळहातावर दिलेला दाब इतका पक्का ठेवा की दुसऱ्याने कोपर पुढे खेचल्यास पंजावर दिलेला दाब सुटणार नाही. - स्नायू क्षोभ यामध्ये मनगट, खांदे, मान, कंबर यावर अनावश्यक ताण दिला गेल्यास सूर्यनमस्कार एक साधना ९१