पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्नायू फारच दुखत आहेत आणि कोणत्या आसनामध्ये चूक झालेली आहे हे समजलेले नाही अशी परिस्थिती असल्यास त्या दिवशी सूर्यनमस्कार घालू नका. दीर्घ श्वसन व सूर्यनमस्कार यांच्या नित्य सरावातून शारीरिक व मानसिक संपूर्ण आरोग्य प्राप्त होते हे लक्षात ठेवा. वेळेच्या अभावी दोन्हींचा सराव करणे शक्य नसल्यास पंधरा मिनिटांमध्ये तीन सूर्यनमस्कार घालण्यामध्ये सातत्य ठेवा. त्यामध्ये खंड पडू देऊ नका. शनिवार, रविवार किंवा सुटीच्या दिवशी, जेव्हा आपल्याला दररोज पेक्षा अधिक वेळ असतो, तेव्हा दीर्घ श्वसनाचा सराव अवश्य करा. सूर्यनमस्काराचे अधिष्ठान जसे प्राणतत्त्व आहे, तसेच औषधाचा आधार सूर्यनमस्कार आहे. काही शारीरिक त्रास सुरू झाल्यास या त्रीमूर्तीची साथ सोडू नका. सूर्यनारायणाची प्रार्थना प्रार्थना म्हणतांना शरीरावर असलेला अनावश्यक ताण काढून टाका. ( शरीरावर असलेला संपूर्ण ताण आपण योगमुद्रेमध्ये / शवासनामध्येच फक्त काढू शकतो.) ध्येयः सदासवितृमंडलमध्यवर्ति नारायणः सरसिजासनसन्निविष्ट: केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी हारी हिरण्यमयवपुर्घृतशंखचक्रः ।। - बृहतपाराशरस्मृति, आदित्यहृदय, १३८ श्लोकाचा अर्थ आकाशातील सूर्यमंडलात मध्यवर्ती असलेला, कमलासनावर बसलेला, हातात बाहुभूषणे व कानात मकराकृत कुंडले व डोक्यावर मुकूट धारण करणारा, गळ्यात हार घालणारा, सर्वांचे दुखः हरण करणारा, सुवर्णमय कांती असलेला, हातामध्ये शंख, चक्र धारण करणारा अशा नारायण स्वरूप सूर्यदेवतेला मी वंदन करतो. माझे सर्व जीवन प्रकाशमान व्हावे म्हणून त्याची प्रार्थना करतो. सूर्यनमस्कार एक साधना ८८