पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र ॐ मित्रायनमः आसनाचा उद्देश - छातीची लवचिकता वाढविणे अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करणे. दम लागणार नाही, हृदयावर ताण पडणार नाही याकडे लक्ष देणे. अनाहत चक्राकडे मन एकाग्र करणे. आरोग्य लाभ छातीची लवचिकता वाढल्यामुळे प्राणतत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. हे जादा प्रमाणात स्वीकारलेले प्राणतत्त्व अधिकाधिक स्नायुपेशींना कार्यरत करते. त्यांची कार्यक्षमता वाढते. उत्साह आनंद वृद्धिंगत होतो. ज्ञानेंद्रियामधील प्राथमिक कमतरता, अनुत्साह, अनामिक भीती, नैराश्य इत्यादी सूर्यनमस्काराच्या नित्य साधनेमुळे कायमचे दूर होतात. प्रणामासान कृती सरळ उभे राहा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. मान ताठ, दृष्टी सरळ ठेवा. अंगठ्याचे मूळभाग छातीच्या मध्यभागी असलेल्या खोलगट भागात ठेवा. सगळी बोटे एकमेकांना चिकटवा. अंगठे व तर्जन्या एकमेकांना चिकटवा. अंगठे छातीपासून दूर आहेत ते छाती लगत घ्या. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दाबून धरा. या दाबाचा प्रवास - हाताचे पंजे, मनगट, हात, दंड, खांदे आणि छाती असा आहे. प्रणामासान मान सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. ( ही सूचना प्रत्येक कृती करतांना पूर्ण सराव सत्रामध्ये पाळावयाची आहे.) तुमचे कोपर शरीरापासून दूर आहेत. सर्व लक्ष अनाहत चक्राकडे ठेवा. सूर्यनमस्कार एक साधना ८९