पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीराममसर्थ ।। सरावसत्र दिवस पहिला साधकांसाठी (विद्यार्थ्यांसाठी) सूर्यनमस्कार दीर्घश्वसन व सूर्यनमस्कार पूरक व्यायाम प्रकार यांचा आजचा सराव पूर्ण झाला. सूर्यनमस्कार सरावामध्ये यापेक्षा अधिक ऊर्जेचा वापर करून जास्तीतजास्त स्नायूपेशी कार्यरत करावयाच्या आहेत. सूर्यनमस्कार सुरू करण्यापूर्वी सूर्यनमस्कारातील आपली प्रगती नियमांच्या मोज पट्टीने मोजू नका. स्नायूं पेशींचा ताठरपणा कमी होण्यासाठी त्यांना भरपूर अवधी द्या. सूर्यनमस्कार साधना सातत्याने अखंडित पणे सुरू राहावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आदर्श आसन स्थिती सराव कौशल्यातून आपोआप सिद्ध होणार आहे याची खात्री ठेवा. सूर्यनमस्कार ही स्वयंसाधना आहे. त्यातील प्रत्येक आसन करतांना त्या त्या आसनातील ऊर्जाचक्राकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यांचे मार्गादर्शन स्वीकारा. तेच तुमच्या साधनेचे सारथ्य करणार आहेत हे लक्षात ठेवा. दररोजचा सराव सातत्याने पूर्ण विश्वासाने करा. साधारण तीन आठवड्यात तीन सूर्यनमस्कारांची वाढ करण्यास हरकत नाही. एक वर्षामध्ये १२ + ०१ सूर्यनमस्कार पंधरा मिनिटामध्ये सहज घालता येतील. तरुण साधकांची शारीरिक क्षमता व साधनेमधील कौशल्य प्रस्थापित झाल्यावर पंधरा मिनिटांमध्ये पन्नास + एक सूर्यनमस्कार आरामत घालता येतील. सूर्यनमस्कार घालतांना चुकीच्या पध्दतीने ताण / दाब दिल्यास स्नायूंचे दुखणे सुरू होते. त्यासाठी दीर्घ श्वासन हा पहिला प्राथमिक उपचार आहे. ज्या भागामध्ये स्नायू दुखत आहेत त्या भागात ताण / दाब देणारे आसन एक / दोन दिवस करू नका. स्नायू दुखत असल्यास दुसऱ्या दिवशी दीर्घ श्वसनाचा सराव नेहमीपेक्षा अधिक वेळ करा. सूर्यनमस्कार एक साधना ८७