पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात वर उचला. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हातांना ऊर्ध्व ताण द्या. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हातांना ऊर्ध्व ताण द्या. दीर्घ श्वास घ्या. संपूर्ण शरीराला ऊर्ध्व ताण द्या. शरीराला मिळालेला ताण पकडा. श्वास सोडा. दोन्ही हात खांद्यातून डावीकडे वाकवा. शरीराच्या उजव्या बाजूवर मिळालेला ताण स्वीकारा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. पाय जमिनीवर पक्के रोवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. आणखी एकदा श्वास सोडा. दोन्ही हात खांद्यातून डावीकडे वाकवा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. पाय जमिनीवर पक्के रोवा. ताण स्वीकारा. तिसऱ्यांदा श्वास सोडा. दोन्ही हात खांद्यातून डावीकडे वाकवा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. पाय जमिनीवर पक्के रोवा. ताण स्वीकारा. थांबा. श्वास घ्या. स्नायूंचा ताण मोकळा करा. हात सरळ करा. हात खाली घ्या. ही क्रिया उजव्या हाताने करा. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. लक्षात ठेवा कोणते स्नायू कार्यरत करायचे आहेत हे लक्षात आल्यावर त्या प्रकारातील इतर व्यायाम प्रकार करण्यास हरकत नाही. प्रकार निवडतांना त्यांचा क्रम चढत्या श्रेणीमध्ये ठेवा. प्रत्येक वेळी थोडी अधिक ऊर्जा वापरली जाते आहे याकडे लक्ष द्या. उंच उडी प्रकार एक : उंच उड्या १२ + ०१ मारावयाच्या आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी उड्या किंवा उंच उड्या माराव्यात. इतरांनी उड्या मारल्या सारखे करावे. सद्गुरू वंदन ( आनंदमुद्रा) पूरक व्यायाम प्रकार एक प्रमाणे. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना ८६