पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडत स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात डोक्यावर ठेवा. क) श्वास घ्या. हात वर उचला. आधीचा ऊर्ध्व दिशेचा ताण पकडा. दोन्ही हात उजवीकडे खांद्यातून वाकवा. शरीराची डावी बाजू आतून वर उचला, उजव्या हाताने डावा हात ओढा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडत स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात डोक्यावर ठेवा. हात खाली घ्या. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. व्यायाम प्रकार एक सरळ उभे राहा. हात शरीराला लागून ठेवा. पाय जमिनीवर पक्के रोवा. श्वास घ्या. डावा हात वर उचला. डाव्या हाताला ऊर्ध्व दिशेला आतून ताण द्या. श्वास सोडा. डावा हात खांद्यातून उजवीकडे वाकवा. डाव्या बाजूने शरीर वर उचला. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. आणखी एकदा श्वास सोडा. डाव्या बाजूचे शरीर वर उचला. डावा हात खांद्यातून उजवीकडे वाकवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. - भाग दोन तिसऱ्यांदा एकदा श्वास सोडा. डाव्या बाजूचे शरीर वर उचला. डावा हात खांद्यातून उजवीकडे वाकवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. सूर्यनमस्कार एक साधना श्वास घ्या. स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात सरळ करा. हात खाली घ्या. ही क्रिया उजव्या हाताने करा. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. व्यायाम प्रकार एक भाग तीन सरळ उभे रहा. हात शरीराला लागून ठेवा. पाय जमिनीवर पक्के रोवा. -