पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फिरवा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ही क्रिया १२ + ०१ वेळा करा. हात खाली घ्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. आता दोन्ही हाताच्या मुठी मनगटातून उलट दिशेन गोलाकार फिरवा. ही क्रिया १२ + ०१ वेळा करा. हात खाली घ्या. क) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे समोरासमोर ठेवा. दोन्ही हाताच्या बोटांची पेरे पक्की आवळा. दाब मोकळा करा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ही क्रिया १२ + ०१ वेळा करा. हात खाली घ्या. अनाहतचक्र, विशुद्धचक्र आणि शरीराची डावी-उजवी बाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार भाग एक व्यायाम प्रकार एक अ) हातांची बोटे एकमेकामध्ये गुंतवा. दोन्ही तळवे डोक्यावर ठेवा. आता तळवे उलटे, म्हणजे आकाशाकडे करा. श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. तिसऱ्यांदा श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडत स्नायूंचा ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात डोक्यावर ठेवा. - ब) श्वास घ्या. हात वर उचला. मघाचा ऊर्ध्व दिशेचा ताण पकडा. दोन्ही हात डावीकडे खांद्यातून वाकवा. शरीराची उजवी बाजू आतून वर उचला. डाव्या हाताने उजवा हात ओढा. क्रिया सूर्यनमस्कार एक साधना डावी-उजवी बाजू ताणणे ८४