पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. उजव्या हातावर ही क्रिया तीन वेळा करा. ब) एकाच वेळी दोन्ही हात खांद्यातून सुलट दिशेने तीन वेळा फिरवा नंतर उलट दिशेने तीन वेळा फिरवा. क) सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये बाजूने उचला. हाताचे पंजे जमिनीकडे ठेवा. श्वास सोडत दोन्ही हात डाव्या बाजूला फिरवा. उजव्या हाताने डाव्या खांद्याची मागील बाजू पकडण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताने उजव्या खांद्याची मागील बाजू पकडण्याचा प्रयत्न करा. पकड घट्ट करा. थांबा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. श्वास घेत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या. हिच क्रिया उजव्या बाजूने करा. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. किंवा दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातांनी स्वत:ला मिठी मारा. व्यायाम प्रकार सहा अ) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे समोरासमोर ठेवा. हाताच्या मुठी आवळा आणि सोडून द्या. क्रिया | करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ही क्रिया २४ + ०१ वेळा करा. हात खाली घ्या. ब) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे समोरासमोर ठेवा. दोन्ही हाताच्या मुठी मनगटातून सुलट दिशेने गोलाकार सूर्यनमस्कार एक साधना हाताचे व्यायाम पंजा-बोटे व्यायाम ८३