पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. मान सरळ करा. ही संपूर्ण क्रिया मानेच्या उजव्या बाजूवर करा. ब) श्वास सोडण्याकडे लक्ष द्या. मान वर उचलून ती डावीकडे वाकवा. विरुध्द बाजूचा ताण स्वीकारा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. हळूहळू मान आणखी डावीकडे वाकवा. मानेला मिळालेला ताण स्वीकारा थांबा. श्वास घेण्याकडे लक्ष द्या. ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. मान सरळ करा. ही संपूर्ण क्रिया मानेच्या उजव्या बाजूवर करा. क) श्वास सोडण्याकडे लक्ष द्या. मान पाठीमागे ढकला. विरुद्ध बाजूचा ताण स्वीकारा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. हळूहळू मान आणखी पाठीमागे ढकला. मानेला मिळालेला ताण स्वीकारा थांबा. श्वास घेण्याकडे लक्ष द्या. ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. मान सरळ करा. मान पुढे वाकवून ही संपूर्ण क्रिया करा. या स्थितीमध्ये मान नेहमीच असते. ही क्रिया ताण न देता थोडक्यात करा. अधिक ताण टाळा. लक्षात ठेवा - - मानेला ताण देतांना संथगतीने हळूवारपणे द्यायचा आहे. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागापर्यंत /नसांपर्यंत पोहचला आहे हे बघायचे आहे. ताण बसलेले शेवटचे टोक पकडून तेथून ताण मोकळा करण्यास सावकाश सुरुवात करायची आहे. मान स्थिर ठेवायची आहे. मानेच्या शिरा शरीरात कुठपर्यंत गेलेल्या आहेत ते अनुभवायचे आहे. व्यायाम प्रकार पाच अ) डावा हात खांद्यातून सुलट दिशेने सावकाश तीन वेळा फिरवा. तोच हात खांद्यातून उलट दिशेने सावकाश तीन वेळा फिरवा. क्रिया करतांना पार्श्वभाग सूर्यनमस्कार एक साधना ८२