पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करा. सर्व क्रिया एकूण तीन वेळा करा. ब) दोन्ही खांदे सुलट दिशेने तीन वेळा फिरवा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास काढून टाका. दोन्ही खांदे उलट दिशेने तीन वेळा फिरवा. क) दोन्ही हातांच्या मुठीमध्ये स्वतंत्रपणे काल्पनिक वजन घ्या. श्वास घ्या. कोपर वाकवा. हळूहळू मूठ बगलेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. कोपर खांद्याच्या सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास काढून टाका. श्वास सोडत हात खाली घ्या. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. दोन्ही हातामधील काल्पनिक वजन तसेच ठेवून हात सरळ डोक्यावर न्या. श्वास सोडत हात कोपरामध्ये वाकवून मानेच्या मागे घ्या. श्वास घ्या. दोन्ही हाताने जोर लाऊन वजन सावकाश वर उचला. हात डोक्यावर सरळ रेषेत आणा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. श्वास सोडत कोपरात हात वाकवून मानेजवळ आणा. दंड कानाजवळ ठेवा. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. व्यायाम प्रकार चार मानेचे व्यायाम भाग एक अ) सरळ उभे रहा. हात शरीराला लागून ठेवा. डोके व मेरुदंड सरळ रेषेत ठेवा. खांदे मोकळे ठेवा. - सूर्यनमस्कार एक साधना - श्वास सोडण्याकडे लक्ष देत मान डाव्या बाजूला वळवा. विरुध्द बाजूचा ताण स्वीकारा क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. हळूहळू मान आणखी डावीकडे वळवा. मानेला मिळालेला ताण स्वीकारा थांबा. श्वास घेण्याकडे लक्ष द्या. ताण मोकळा करा. मानेचा व्यायाम ८१