पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताणा ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहेत याकडे लक्ष द्या. हात खाली. . क) श्वास घ्या. हात वरती घ्या. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे समोरा समोर श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेलाताण द्या. श्वास घ्या. खांद्यांचा आधार घेऊन हात मागे ढकला. आणखी एकदा श्वास घ्या. ढकला. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ढकला. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. ताण स्वीकारा. थांबा. श्वास सोडा. हात सरळ करा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. व्यायाम प्रकार दोन- भाग तीन - अ) खांद्याच्या सरळ रेषेत हात वर उचला. पंजे जमिनीकडे. छातीमध्ये खोल श्वास घ्या. दोन्ही हात बाजूला ताणा. दोन्ही हात छातीपासून बोटांपर्यंत ताणा. छाती विस्फारली जाते आहे याकडे लक्ष द्या. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा. ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. ब) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे तळवे समोरासमोर. खांद्यातून हाताला पुढे ताण द्या. खांदे व छाती याकडे लक्ष द्या. (येथे चूक होत असल्यास हे आसन करू नका.) क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. क) श्वास घ्या. हात वरती घ्या. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे सूर्यनमस्कार एक साधना ७९