पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. क) श्वास घ्या. हात सरळ रेषेत वर घ्या. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे पंजे समोरासमोर ठेवा. श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा. ताण स्वीकारा. थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली घ्या. व्यायाम प्रकार दोन भाग दोन अ) खांद्याच्या सरळ रेषत दोन्ही हात बाजूला उचला. पंजे आकाशाकडे. छातीमध्ये खोल श्वास घ्या. दोन्ही हात बाजूला ताणा हाताच्या पंजावर आकाशाचे वजन पेला. दोन्ही हात छातीपासून बोटांपर्यंत ताणा. छाती विस्फारली जाते आहे याकडे लक्ष द्या. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. आकाशाचे वजन स्वीकारा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा. आकाशाचे वजन स्वीकारा दिलेला ताण व वजन स्वीकारा थांबा श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. ब) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर. हाताचे तळवे समोरासमोर. खांद्यातून हाताला पुढे ताण द्या. खांदे व छाती याकडे लक्ष द्या. (येथे चूक होत असल्यास हे आसन करू नका.) क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. सूर्यनमस्कार एक साधना ७८