पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शरीराला मिळालेला ऊर्ध्व ताण छातीसह पकडा. तो स्वीकारा. श्वास सोडा. ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली नमस्कार स्थिती. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा या वंदन क्रियेमध्ये सरळ उभे राहणे, खांद्यामधून हात मागे ढकलणे, दृष्टी हातांच्या पंजाकडे या तीन क्रिया महत्वाच्या आहेत. प्रत्येक कृती पुढील क्रिया चांगल्या पद्धतीने करता यावी म्हणून करावयाची आहे. या ठिकाणी प्रत्येक कृतीमधून अधिकाधिक स्नायू कार्यप्रवृत्त करावयाचे आहेत. स्नायूंच्या कार्यशक्ती बरोबर प्राणतत्त्वाचा धक प्रमाणात पुरवठा करावयाचा आहे. व्यायाम प्रकार दोन अ) खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात बाजूला उचला. पंजे जमिनीकडे. छातीमध्ये खोल श्वास घ्या. दोन्ही हात बाजूला ताणा. दोन्ही हात छातीपासून बोटांपर्यंत ताणा. छाती विस्फारली जात आहे याकडे लक्ष द्या. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास मोकळा करा. श्वास घ्या. ताणा. - भाग एक पुन्हा एकदा श्वास घ्या. ताणा. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा ताण स्वीकारा. थांबा. श्वास सोडा. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. हात खाली. ब) दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये पुढे उचला. दोन्ही हातामध्ये खांद्याचे अंतर ठेवा. हाताचे तळवे समोरासमोर करा. खांद्यातून हाताला पुढे ताण द्या. खांदे व छाती याकडे लक्ष द्या. (येथे चूक होत असल्यास हे आसन करू नका.) क्रिया करतांना पार्श्वभाग सूर्यनमस्कार एक साधना प्रकार दोन मान छाती - ७७