पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अधिक ऊर्जेचा वापर आपण आता सूयर्नमस्कार पूरक व्यायाम प्रकारात करणार आहोत. सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम सूचना सरळ उभे रहा. तुमच्या बरोबर असलेल्या साधकाला विचारून सरळ उभे आहात याची खात्री करा. आरशासमोर डावीकडे किंवा उजवीकडे तोंड करून उभे रहा. खात्री करा. भिंतीवर डावीकडे किंवा उजवीकडे एखादी सरळ उभी खूण बघा त्याला समांतर उभे राहा. कानापासून पायाच्या घोट्यापर्यंत एक काल्पनिक उभी रेषा काढा. शरीराचे वजन दोन्ही पायांच्या तळव्यावर सारखेच विभागलेले आहे याकडे लक्ष द्या. पुढे झुकून उभे राहिल्यास चवडा व गुडघा यांच्यावर दाब पडतो. मागे झुकून उभे राहिल्यास टाचा व पोटऱ्यांवर दाब पडतो. शरीरावर कोठेही अनावश्यक ताण नाही याकडे लक्ष देऊन सरळ उभे राहणे फार महत्वाचे आहे. अनाहतचक्र विशुध्द चक्र याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक सद्गुरु वंदन (आनंदमुद्रा) पूर्वेकडे तोंड करून सरळ उभे राहा. हात नमस्कार स्थितीमध्ये. सद्गुरुंचा जयजयकार करा. (जयजय रघुवीर समर्थ) श्वास घ्या. हात वर उचला. पंजे सूर्याकडे. दोन्ही हातांमध्ये खांद्याचे अंतर ठेवा. श्वास घ्या. शरीर वर खेचा. हात खांद्यातून मागे न्या. दृष्टी हाताच्या पंजावर ठेवा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराच्या इतर भागावर ताण असल्यास काढून टाका. सूर्यनमस्कार एक साधना आनंदमुद्रा ७६