पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या ऊर्जाचक्राकडे लक्ष देऊन त्यांना प्राणतत्त्वाचा अधिक पुरवठा करून त्यांना कार्यरत करणे. सूर्यनमस्कार स्वयंसाधनेतील ऊर्जाचक्राचे महत्व अनुभविणे. ज्या भागावर ताण- दाब दिलेला आहे तो भाग सोडून इतर सर्व स्नायू तणावमुक्त ठेवणे. आपले दररोजचे उद्दिष्ट सूर्यनमस्कार साधना सातत्याने व नियमितपणे करणे हे आहे. आदर्श सूर्यनमस्कार घालणे हे नाही. सूर्यनमस्कारातील आपली प्रगती नियमांच्या मोजपट्टीने मोजू नका. सरावामधील सातत्य - श्रद्धा- सबुरी आज नाही उद्या आपणाला सर्व कौशल्ये प्रदान करणार आहेत याची खात्री बाळगा. सूर्यनमस्कार पूरक व्यायाम सूचना प्रत्येक कृती केल्यावर शरीराला कोठे किती कोणत्या प्रकारचा ताण किंवा दाब मिळालेला आहे याकडे लक्ष द्या. स्नायूंची ताकद त्यांच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यांच्या वजन-आकारावर नाही. - दाबाचे दोन प्रकार वरतून खाली दिलेला दाब व खालून वरती दिलेला दाब. हेच ताण देण्याचेही दोन प्रकार आहेत. पाचवा प्रकार स्नायूंची ताण विरहित स्थिती असा आहे. ज्या स्नायुंना ताण किंवा दाब मिळालेला नाही ते तणाव मुक्त ठेवणे हे सर्वात महत्वाचे. हा नियम वारंवार दुर्लक्षित झाल्यास स्नायूंचे दुखणे सुरू होते. प्रत्येक क्रिया सावकाश करा. ती क्रिया पूर्ण झाल्यावर थोडं थांबा. शरीरावरील ताण / दाब स्वीकारा. नंतर पुढचे आसन करा. आसन करतांना शरीराची अनावश्यक ओढा ताण करू नका. स्नायूंना जादा ताण, जोर- र-झटका देऊ नका. स्नायूंचा ताठरपणा कमी करण्यासाठी त्यांना फक्त मदतीचा हात द्या. आदर्श स्थिती गाठण्याची घाई करू नका. आपण करीत असलेल्या कार्यावरील निष्ठा-श्रद्धा-सातत्य यामुळे क्रियेमध्ये नियमितता येते. यातूनच क्रियेतील आदर्श स्थिती विनासायास जमते. सर्व फायदे आज ना उद्या नक्कीच मिळणार याची खात्री बाळगा. दीर्घश्वसन सरावामध्ये आपण ऊर्जाशक्तीचा वापर केला. त्यापेक्षा सूर्यनमस्कार एक साधना ७५