पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। सरावसत्र दिवस पहिला सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम सूर्यनमस्काराला पूरक असलेले व्यायाम प्रकार किंवा योगासने अनेक आहेत. सर्व व्यायाम प्रकार हे सूर्यनमस्कारालाच जाऊन मिळतात. कारण सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करता येतात. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावातून शरीरातील पाच ऊर्जाचक्रे- अनाहतचक्र, विशुद्धचक्र, स्वाधिष्ठानचक्र, आज्ञाचक्र, मणिपूरचक्र कार्यरत होतात. या पाच ऊर्जाचक्रांची किंवा चोवीस न्यासकेंद्रांची लवचिकता वाढविणारे कोणतेही व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार कौशल्य वाढविण्यासाठी पूरक आहे. आपली शारीरिक क्षमता असल्यास पुढे दिलेले सर्व व्यायाम प्रकार दररोज करा. फार थकवा वाटत असल्यास दररोज क्रमाने एक दिवसाचा व्यायाम प्रकार करा. कोणताही व्यायाम बलस्यार्धेन कर्तव्यः । म्हणजे आपल्या क्षमतेच्या निम्म्याने करावा. श्वास घेण्यास तोंडाची मदत लागू नये हे बघावे. व्यायाम प्रकारामधून सूर्यनमस्कार कौशल्य वाढविता येते. किंवा सूर्यनमस्कारातून शरीराला अधिक चांगला व्यायाम मिळतो असे म्हणता येईल. अर्थात स्नायूंचा ताठरपणा जाऊन लवचिकता येण्यास किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येत नाही. हा कालावधी वय, शारीरिक आरोग्य, वजन, व्यवसाय-नोकरीचे स्वरूप, शारीरिक व्याधी विकार, दररोजचा आहार, अयोग्य सवयी आणि सूर्यनमस्कार साधनेवर असलेली आपली भक्ती - श्रद्धा यावर अवलंबून आहे. पूरक व्यायाम प्रकार उद्दिष्टे ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करणे म्हणजे स्नायूपेशींचे अणु-रेणू, त्यांचे अवकाश यांना ताण- दाब देऊन मालिश (अभ्यंग) करणे, त्यांची लवचिकता व कार्यक्षमता वाढविणे. प्रत्येक कृती करतांना त्या भागातील स्नायूंची लवचिकता वाढविणे, त्या सूर्यनमस्कार एक साधना ७४