पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाली वाकून दोन्ही हाताचे कोपर गुडघ्याचे समोर ठेवा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. डोके हातावर टेकवा. श्वासप्रक्रिया नेहमीप्रमाणे सर्व लक्ष स्वाधिष्ठान चक्राच्या भागाकडे द्या. या भागातील स्नायूंचा ताण मोकळा करा. त्याचा अनुभव घ्या. हळूहळू कंबर, पाठ, खांदे, मान, डोके या ठिकाणी असलेला ताण मोकळा करा. ताण मोकळा करण्याची क्रिया क्रमश: तीन वेळा करा. प्रत्येक वेळी गुरुवंदन श्लोक म्हणा किंवा आपल्या आईचा उत्साही आनंदी चेहरा मन:पटलावर बघा. दीर्घ श्वास घ्या आणि तळहात जमिनीवर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि तळहाताने जमिनीवर रेटा देऊन खांदे वर उचला. दीर्घ श्वास घ्या आणि गुडघे वर उचलून लवणे व्हा. दीर्घ श्वास घ्या आणि सरळ उभे रहा. लक्षात ठेवा स्वाधिष्ठान चक्राचे स्नायू मोकळे होतांना नसा मोकळ्या होत आहेत, त्यांचा ताठरपणा कमी होतो आहे, त्यांची बद्ध अवस्था संपते आहे हे लक्षात येते. आईचा चेहरा मन:पटलावर पकडून ठेवा. सूर्यनमस्काराची साधना जशी वाढेल तसे या मातृ प्रतिकाचे रुपांतर आदिशक्ती, कुलदेवता, आराध्य देवता, इष्ट देवता किंवा सद्गुरूंचे चरण यामध्ये होत जाईल. - सूर्यनमस्कार एक साधना ७३