पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना साधकांची प्रस्तावना पुस्तकाला प्रमाणित करते म्हणून ती आवश्यक. एक विचार मनाची पकड घेतो. त्याच्या सततच्या मनन चिंतनातून अभ्यास विषयाची साधना सुरू होते. अभ्यास विषयाचे एक एक गूढ हळूहळू उलगडत जाते. विस्मृतीमध्ये गेलेले ज्ञान सूर्यप्रकाशात उजळून निघते. आजपर्यंत लक्षात न आलेले हे पैलू ज्ञानप्रकाशात आल्यावर आपले 'घटाकाश' सुवर्णमय करून टाकतात. या ज्ञानप्रकाशात आपण दिपून जातो. अत्यानंदित होतो. आपल्याला मिळालेला आनंदबोध समाजात संक्रमित करण्याची बाधा सुरू होते. हरएक प्रकारे सर्वांना हा आनंदप्रसाद वाटण्यास सुरुवात होते. आपला यज्ञ लोकार्पण करावा म्हणून लेखक पुस्तक रुपाने तो प्रसिध्द करतो. - या विषयामधील तज्ज्ञ व्यक्तीला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली जाते. या विषयातील त्याचे शिक्षण, अनुभव व अधिकार सर्वमान्य असतात. त्याने केलेले पुस्तकाचे परीक्षण निरपेक्ष, अभ्यासपूर्ण व प्रभावी असते. विषय काय आहे, कसा आहे, त्याची मांडणी, भाषाशैली इत्यादी उहापोह तो प्रास्ताविकात करतो. लेखकाने मांडलेल्या विषयाची सर्वांगीण चर्चा करतो. प्रतिपाद्य विषयाचे सामाजिक/सांस्कृतिक महत्त्व, व्यावहारिक उपयोग व उपयुक्तता इत्यादी मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. या विषयाचे संदर्भात लेखकाने मांडलेले महत्त्वाचे विचार, त्यांचे वेगळेपण, केलेली मांडणी, सुरुवात, शेवट याबद्दल तो आपले मत व्यक्त करतो. आपला स्वतःचा अनुभव कथन करतो. यामध्ये काही उणीवा असल्यास मार्गदर्शक सूचना करतो. थोडक्यात तज्ज्ञ व अधिकारी व्यक्तीने पुस्तकाचे सर्वांगीण, सडेतोड व निरपेक्ष केलेले परीक्षण म्हणजे प्रस्तावना असे म्हणता येईल. प्रस्तावना पुस्तकाची जाहिरात असते. पुस्तकाचे प्रथम परीक्षण असते. वाचकांनी पुस्तक वाचावे, वाचून संग्रही ठेवावे म्हणून केलेली जाहिरात असते. वाचकही अगोदर प्रस्तावना, मग पुस्तक वाचतात. पुस्तक विकत घेण्यापूर्वी लेखक कोण, प्रस्तावना कोणाची याचा विचार करतात. काही वेळेला पुस्तकाची प्रस्तावना अभ्यासण्यासाठी पुस्तक विकत घेतले जाते. काही मान्यवर अमक्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे म्हणून समाजात ओळखले जातात. काही जण सूर्यनमस्कार एक साधना X