पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विलोमचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. ही संपूर्ण क्रिया तीन वेळा करा. प्रकार क अनुलोम-विलोम क्रिया प्रात्यक्षिक सूचना सरळ बसा. आरामात बसा. उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने दीर्घ-खोल श्वास सावकाश हळुवारपणे घ्यावयास सुरुवात करा. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर तो छातीमध्ये पकडा. - - पार्श्वभागाच्या स्नायूंवर ताण-दाब नाही याची खात्री करा. डावी नाकपुडी बंद करा. उजवी नाकपुडी उघडा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजवी नाकपुडी साफ करण्यासाठी हाच श्वास दमदारपणे वेगाने बाहेर फेका उजव्या नाकपुडीने छातीमध्ये हवा भरून घ्या. डावी नाकपुडी साफ करण्यासाठी हाच श्वास दमदारपणे वेगाने बाहेर फेका. नाकपुडी बदलून ही क्रिया तीन वेळा करा. नाकामधून निघालेला विजातीय द्रावरूमालाने पुसून टाका. सराव जसा वाढेल त्याप्रमाणात पाच/सात/नऊ/ अकरा किंवा बारा + एक वेळा ही क्रिया करा. लक्षात ठेवा नियम : ज्या नाकुपडीने जो श्वास घेतलेला आहे तो श्वास त्याच नाकपुडीने सोडावयाचानाही. डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडावयाचा, उजव्या नाकपुडीने घेतलेला डाव्या नाकपुडीने. एका नाकपुडी नंतर दुसरी हा क्रम पकडा. क्रम चुकल्यास पुन्हा प्रथमपासून सुरुवात करा. दोन्ही फुफ्फुसाची हवा ग्रहण करण्याची क्षमता सुमारे ५००० सी.सी. आहे. आपल्या शरीरामध्ये वायुकोशांचा विस्तार सर्वत्र आहे. हा विस्तार आपल्या शरीराच्या क्षेत्रफळापेक्षा साधारण शंभर पट अधिक आहे. त्यामुळे प्राणतत्त्वाची देवाण घेवाण सुलभ होते. सद्गुरुवंदन सद्गुरुवंदनाने दीर्घश्वसनाचा आजचा अभ्यास पूर्ण करू. गुडघ्यावर उभे रहा. चवड्यावर पार्श्वभाग टेकवा. ( वज्रासन) सूर्यनमस्कार एक साधना ७२