पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्षात ठेवा नाकपुडीचा गोलाकार जोर न देता हळूवारपणे दाबा. प्राणायाम करतांना उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर, तर्जनी व मधले बोट कपाळावर, अनामिका डाव्या नाकपुडीवर, कनिष्ठिका अनामिकेवर ठेवलेली ही बोटांची आदर्श स्थिती झाली. सध्या प्राणायामाची कृती महत्वाची त्याकडे लक्ष द्या. बोटांची स्थिती हळूहळू जमेल. श्वास जोरात बाहेर फेकतांना संपूर्ण लक्ष नाक व छातीकडे ठेवायचे आहे. यामध्ये चूक झाल्यास घसा खरवडला जाईल. असे झाल्यास हा प्रकार आज पुन्हा करू नका. अनुलोम - विलोम - - - पूर्ण तयारी - तीन वेळा पूरक व रेचक करा. अनुलोम विलोम क्रिया प्रात्यक्षिक सूचना सरळ बसा. आरामात बसा. उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने दीर्घ - खोल श्वास सावकाश हळुवारपणे घ्यावयास सुरुवात करा. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर तो छातीमध्ये पकडा. प्रकार अ प्रकार - ब - - - पार्श्वभागाच्या स्नायूंवर ताण - दाब नाही याची खात्री करा. डावी नाकपुडी बंद करा. उजवी नाकपुडी उघडा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. श्वास सोडतांना होणाऱ्या नादाकडे लक्ष द्या. त्याच नाकपुडीने (उजव्या) दीर्घ-खोल श्वास घेण्यास सुरुवात करा. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर तो छातीमध्ये पकडा. पार्श्वभागाच्या स्नायूंवर ताण - दाब नाही याची खात्री करा. उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी उघडा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. श्वास सोडतांना होणाऱ्या नादाकडे लक्ष द्या. त्याच नाकपुडीने (डाव्या) दीर्घ - खोल श्वास घेण्यास सुरुवात करा. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर तो छातीमध्ये पकडा. पार्श्वभागाच्या स्नायूंवर ताण - दाब नाही याची खात्री करा. डावी नाकपुडी बंद करा. उजवी नाकपुडी उघडा. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. श्वास सोडतांना होणाऱ्या नादाकडे लक्ष द्या. अनुलोम- सूर्यनमस्कार एक साधना ७१