पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयुष्यामध्ये नेत्र, कान, वाणी यांची कार्यक्षमता अबाधित राहो, आमच्या वाट्याला धन-बुद्धी - शक्ति यांचे दारिद्र्य येऊ नये. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ आरोग्यसंपन्न जीवन आम्हाला मिळावे म्हणून आम्ही सूर्यरुपी नारायणाची प्रार्थना करतो. ।।४।। नाडी शोधन क्रिया - - प्रकार अ पूर्वतयारी तीन वेळा पूरक व रेचक करा. प्रकार ब नाडी शोधन क्रिया प्रात्यक्षिक सूचना : सरळ बसा. आरामात बसा. एकाच नाकपुडीने पुरक व रेचक करायचा आहे. उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर टेकवा. उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने दीर्घ- खोल श्वास सावकाश हळुवारपणे घ्यावयास सुरुवात करा. सर्व लक्ष छातीकडे द्या. श्वास घेण्याकडे द्या. श्वास घेतांना आवाज होणार नाही याकडे लक्ष द्या. पूर्ण श्वास घेऊन झाल्यावर तो छातीमध्ये पकडा. थोडं थांबा. त्याच नाकपुडीने श्वास सोडण्यास सुरुवात करा. श्वास सोडतांना होणाऱ्या नादाकडे लक्ष द्या. ओटीपोट व बाजूचा भाग पूर्ण रिकामा करा. ही क्रिया आणखी दोन वेळा याच नाकपुडीने करा. नाकपुडी बदला. डावी नाकपुडी बंद करण्यासाठी डाव्या हाताचा उपयोग करण्यास हरकत नाही. ही क्रिया तीन वेळा करा. प्रकार क नाडी शोधन क्रिया प्रात्यक्षिक सूचना डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. छातीमध्ये पकडा. थोडं थांबा. संपूर्ण लक्ष छातीकडे ठेवा. डाव्या नाकपुडीनेच श्वास सोडा. श्वास सोडतांना डावी नाकपुडी साफ करावयाची आहे. संपूर्ण लक्ष नाक व छातीकडे ठेवा. श्वास दमदारपणे वेगाने बाहेर सोडा. ही क्रिया तीन वेळा करा. नाकामधून निघालेला विजातीय द्राव रूमालाने पुसून टाका. नाकपुडी बदलून ही क्रिया तीन वेळा करा. सूर्यनमस्कार एक साधना ७०