पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उदुत्यं जातवेदसं देवं वहंति केतवः ।। दृशे विश्वाय सूर्यम्||२|| चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः । आप्रा द्यावा पृथिवी अंतरिक्ष सूर्य आत्माजगत स्तस्थुषश्च।।३।। तच्चक्षुर्देवहितं पुरस्ता च्छुक्रमुच्चरत्।। पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतं श्रृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतम् अदीना: स्यामशरदः शतं भूयश्च शरदशतात्।।४।। ।। ॐ शांतिः शांति: शांतिः ।। ( यजुर्वेद २०/२१, ७४१, ७४२, ३६।२४) सूर्यस्तुती (सूर्यवंदना) मंत्रांचा अर्थ माया, भास, अज्ञान आणि तमोगुण या सर्वांनी युक्त असलेल्या व्यावहारिक जगाच्या वातावरणातून बाहेर पडून सूर्यदेवतेकडे बघत त्याच्याही पलीकडे असलेल्या ज्योतीरुप ब्रह्मलोकात मी प्रवेश करतो आहे. ।। १ ।। सर्वकर्मांचा साक्षीभूत असणाऱ्या भास्कराला विश्वाचे संपूर्ण ज्ञान सूर्यकिरणांनी होते.।।२|| सूर्यनारायणाने उदय झाल्याबरोबर रात्रीच्या अंधकाराचा नाश केला आणि इतर तेजस्वी ताऱ्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणले. हा सूर्यनारायण प्रकाशमय ज्ञानविज्ञानाचा आश्रयस्थान आहे. मित्र, वरुण, अग्नी या देवतांचे नेत्र आहे. याचा उदय झाल्याबरोबर धुलोक, पृथ्वीलोक व अंतरिक्षलोक प्रकाशमय होतात. हा सूर्यनारायण संपूर्ण विश्वातील चल-अचल, सजीव-निर्जीव सर्वांचे संचलन करणारा अंतरात्मा आहे. ||३|| - विश्वाचे तेजरूपी नेत्र असलेल्या सूर्यदेवतेचा उदय पूर्वदिशेला होतो. हे तेज देवांना प्रिय आणि परमपवित्र आहे. या तेजप्रसादाने आमच्या शंभर वर्षांच्या सूर्यनमस्कार एक साधना ६९