पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाद ॐ सूचना- पूरक करा. रेचक करतांना ॐ चा उच्चार करा. ॐ चा उच्चार तीन मात्रांमध्ये करावयाचा आहे. अ + ऊ + म. यांचा उच्चार चढत्या क्रमाने करावयाचा आहे.
 'अ' चा उच्चार दोन सेकंद केला तर 'ऊ'चा उच्चार चार सेकंद करा आणि 'म'चा उच्चार आठ सेकंद करा. 'म'चा उचार करतांना ओठ बंद ठेवा.
 'अ'चा उच्चार पोटामध्ये ऐका. 'ऊ'चा उच्चार छातीमध्ये ऐका. 'म'चा उच्चार मस्तिष्कमध्ये ऐका.
 शरीराच्या या तीन अवयवांकडे लक्ष द्या. वापरलेले प्राणतत्त्व येथूनच मोकळे होते आहे याकडे लक्ष द्या.
 प्रथम वायू ॐ नंतर नाद ॐ या क्रमाने तीन वेळा ॐ कार म्हणावयाचा आहे. प्रत्येक वायू ॐ / नाद ॐ पूर्ण झाल्यानंतर तीन सर्वसाधारण श्वास घ्या. त्यातील पहिला श्वास-उच्छ्वास, इतर दोन श्वासांपेक्षा अधिक दीर्घ व खोल असतो.
लक्षात ठेवा- 8  ॐ च्या उच्चारामुळे मणिपूर चक्र, अनाहत चक्र व आज्ञाचक्र यामध्ये सूक्ष्म ध्वनी कंपने तयार होतात. या कंपनामुळे पचनसंस्था, रुधिराभिसरणसंस्था, मज्जासंस्था प्रभावित होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते.

सूर्योपस्थानम्

ॐ उद्वयन्तमसस्परिस्वः पश्यंत उत्तरम्।। देवन्देवत्रा सूर्यमगन्मज्योतिरूत्तमम्।।१।। 8 संदर्भ घ्या उत्तरार्ध समंत्रक सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार एक साधना ६८