पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दीर्घ श्वसनाचे तीन प्रकार आहे. त्यातील पहिला प्रकार अनाहत चक्राकडे लक्ष देऊन श्वास घेण्याचा आहे. या श्वसन प्रकाराचा सराव येथे करायचा आहे.  छातीकडे लक्ष ठेवणे महत्वाचे. चूक होत असल्यास अनावश्यक स्नायूंवर चुकीचा ताण पडून त्रास होण्याची शक्यता.
 मान सरळ स्थितीमध्ये आहे याची खात्री करा. शहाळे पितांना स्ट्रॉ

वाकडी झाल्यास नारळाचे पाणी तोंडात ओढता येत नाही हे लक्षात ठेवा.
 आपल्या डोळ्यांच्या उंचीवर ॐ ची प्रतिमा लावल्यास त्याकडे बघून मान सरळ ठेवणे सहज जमेल.
पार्श्वभागाच्या स्नायूंवर किंवा इतर भागावर ताण / दाब पडणे म्हणजेच छातीकडे असलेले लक्ष कमी होणे होय. म्हणून श्वास सोडतांना तो शरीराच्या कोणत्या भागातून बाहेर पडतो आहे याकडे लक्ष द्या. चूक होत असल्यास ती लगेच सुधारा.
 पार्श्वभागाचे स्नायूंवर ताण / दाब पडणे म्हणजे त्या भागातील स्नायुंवर मन एकाग्र होणे. ज्या ठिकाणी मन एकाग्र होते त्या ठिकाणी शक्ती / ऊर्जा तयार होते. ही चूक वारंवार होत असल्यास मूळव्याधीचा त्रास होण्याचा संभव असतो.
 घशातील अन्न नलिकेची झडप उघडून नाकाने श्वास सोडण्यासाठी खालील कोणतीही एक पध्दत पहिले दोन तीन दिवस वापरा. त्यानंतर याप्रकारचा  श्वास सोडणे सहज जमते.
 ॐ चा उच्चार न करता अन्ननलिकेतून श्वास सोडा. फुंकणीने अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ओठ बंद ठेऊन फुंकर मारा. एखादे गुपित दुसऱ्याचे कानात घशातून मोठ्याने सांगा. एक आवंढा गिळून घशातून श्वास सोडा.
 7 दीर्घ श्वसनाच्या तीनही सत्रामध्ये श्वास सोडणे / श्वास घेणे ( रेचक / पूरक) याच पध्दतीने करावयाचे आहे. या दोन्ही क्रिया व्यवस्थित जमायला लागल्यावर पुढील प्रकारांचा सराव सुरु करा.
"प्राणायामाने नाडी शोधन होते म्हणजे काय घडते? संदर्भ- उत्तरार्ध शंका समाधान वाचा. सूर्यनमस्कारZ C

६७