पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दीर्घ श्वसन उद्देश   सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू राहावी यासाठी प्रयत्न करणे. साधनेमध्ये श्रद्धा सातत्य व सबुरी असल्यास आसनातील आदर्श स्थिती कालांतराने आपोआप सिद्ध होते याची प्रचिती घेणे.
 शरीराच्या प्रत्येक पेशीमधील अवकाश व बाहेरील अवकाश यांचा संयोग वाढविणे. सूर्यनमस्कारामुळे शरीराची ऊर्जा / उष्णता वाढणार आहे. त्यासाठी सर्व स्नायूंना प्राणतत्त्वाचा पुरवठा अधिक प्रमाणात करणे. ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते त्या त्या ठिकाणी शक्ती / ऊर्जा तयार होते याचा अनुभव घेणे. सूर्यनमस्कार पाच तत्त्व  स्नायुंची ताकद त्याच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यांच्या आकार किंवा वजनावर नाही.
 ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. स्नायू ज्या प्रमाणात श्रम करतात त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा खुराक द्या. सूर्यनमस्कारामध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत करण्याचा प्रयत्न करा. सूर्यनमस्काराची संकल्पना दररोजच्या सरावामध्ये अनुभविण्याचा 'दृष्ट्या वचसा मनसा' प्रयत्न करा.
महत्त्वाच्या सूचना  दीर्घ श्वसन करतांना श्वास सोडण्यासाठी अधिक वेळ वापरावयाचा आहे. श्वास सोडतांना ओटीपोटामधील सर्व श्वास प्रयत्नाने बाहेर सोडा म्हणजे हे वेळेचे तंत्र सांभाळणे सहज जमते.
-  5 रेचक शांतपणे, सावकाश, एका लयीमध्ये, घशातून पण नाकाने करा. चूक झाल्यास शक्ती क्षय होतो. अशक्तपणा जाणवतो. श्वसनाच्या नैसर्गिक गतीचा निरोध म्हणजे प्राणायाम श्वासप्रश्वासयोर्गति विच्छेदः । हे तत्त्व लक्षात ठेवा.
5 अत्यंत आवडणारा पदार्थ चवीने खातो आहे. तो संपण्यापूर्वीच जेवणाचे पान ओढून घेतले तर काय होईल ? दीर्घश्वास घ्या. थांबा. स्नायूपेशींना आस्वाद घेऊ द्या. घाई करू नका. सूर्यनमस्कार एक साधना ६६