पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्षात ठेवा - सूर्यनमस्कार शिकण्याची सुरुवात दीर्घ श्वासनाच्या अभ्यासाने करावयाची आहे. साधारणपणे आपली एक नाकपुडी दोन तास श्वासोच्छवास घेण्याचे कार्य करते. त्यानंतर हे कार्य दुसरी नाकपुडी सुरू करते. प्राणायामाच्या सरावामुळे आपल्या दोन्ही नाकपुड्या एकाचवेळी श्वास- उच्छवास घेण्याचे कार्य सुरू करतात. त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्राणतत्त्वाचा पुरवठा होतो. शरीराला शक्ती आरोग्य प्राप्त होते. श्वास घेणे आणि सोडणे सातत्याने सुरू असले तरी शरीरातून सर्व प्राणतत्त्व उच्छवासावाटे बाहेर टाकता येत नाही. प्राण असेपर्यंत शरीर निर्वात होत नाही. प्रत्येक श्वसन चक्र पूर्ण झाल्यावर शरीरात साधारणपणे ५०० सी.सी. हवा शिल्लक राहतेच. याला शेषवायू म्हणतात. हीच संजीवक शक्ती आहे. याच शेषावर आत्माराम शेषशाही भगवान पहुडले आहेत. 4 पंचप्राणाने वायुपुत्र मारुतीराया हृदयस्थ आत्मारामाची सेवा करीत आहे. शरीरामधील ऊर्जाचक्र त्याच्या मदतीला आहेतच. मरुत, वायू, शक्ती, मन, प्राणतत्त्व, आत्माराम, विष्णू ही सर्व विशेषणे दीर्घ श्वसन / प्राणायाम याकडे निर्देश करणारी आहेत. प्राणायाम साधनेच्या आधीन व्हा. शरण जा. ही साधना तुमच्या शरीराचे रक्षण करणारी आहे. तसेच तुमच्या आत्मारामाला 'ब्रह्मानंद' प्राप्त करून देणारी एकमेव साधना आहे. या विवेचनाचा आधार घेऊन खालील ओळी वाचा त्या अधिक अर्थपूर्ण होतील. राम दुआरे तुम रखवारे । होत न आज्ञा बिनु पैसारे ||२१|| सब सुख लहैं तुम्हारी सरना । तुम रक्षक काहु को डरना ||२२|| हनुमान चालीसा, तुलसीदास महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे । सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ।। 4 संदर्भ घ्या पूर्वार्ध, करन्यासाची कृती सूर्यनमस्कार एक साधना - - मारुती स्तोत्र, रामदास स्वामी ६५