पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हाति.६७ (३) ठा आहे. राजांची उत्पन्नें उत्तरोत्तर वाढदोन लाख 41.8 .20 समुद्रांत शंख, चक्र, गदा व पद्म ही सांपडतात. ह्याप्रमाणे त्या प्रांतांत अनेक तोर्ये असन, ब्राह्मणांची व श्रावकांची असंख्य देवळे अवश्य पाहण्यालायक आहेत. भगवान् श्रीकृष्ण निजधामास गेले ती जागा प्रभास क्षेत्रांत हिरण्य नदीचे कांठी आहे. प्रभास व पाटण यांसच हल्ली अनुक्रमें सोरटी सोमनाथ व वेरावळ बंदर ह्मणतात. ह्या प्रांतांत गिर नांवाचा पर्वत फार मोठा असून, दुसरा एक गोपचा डोंगर ह्मणून आहे; तोही बराच मोठा आहे. ह्याचप्रमाणे त्यांत नद्याही विपुल आहेत. ह्या प्रांतांत कापूस फार पिकतो त्यामुळे राजांची उत्पन्ने उत्तरोत्तर वाढत आली आहेत. इंग्रज सरकार येण्यापूर्वी भावनगर संस्थानचे उत्पन्न सालीना दोन लाख रुपयांचे होते. परंतु त्याच संस्थानचे उत्पन्न हल्ली प्रतिवर्षी वीस लाख रुपये होत आहे. याच मानाने इतर संस्थानची उत्पन्ने वाढली आहेत. ह्या प्रांतांतील सर्व राजांपासून श्रीमंत गाइकवाड सरकारास मुलूखगिरी नांवाची खंडणी दर वर्षी मिळत असते. जुनागडचे नबाबास पोषकष द्यावा लागतो. ह्या संस्थानांत नरसी मेहता नांवाचा एक मोठा भगवद्भक्त साधु पुरुषाची जागा आहे, व येथेंच अशोक राजाच्या हातचा शिलालेख असून, गोसावी महाराजांची एक गादी आहे. ह्या प्रातांचे प्राचीन इतिहासाला ससाक्ष झणण्याचे कारण असे की, यांत जी जी ह्मणून गोष्ट लिहिली आहे त्या त्या गोष्टीस काही तरी साक्ष मणजे दाखला आहे. भाट लोकांचे ग्रंयांतील वर्णन, शिलालेख, किंवा ताम्रपट असे काही तरी आधारभूत घेऊन ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्यांस ससाक्ष असें ह्मणण्याचा परिपाठ आहे. सुराष्ट्र हा प्रांत गुजराथेच्या पश्चिम बाजूस अमदाबाद, धोलका व धुंधुका यांजपासन दारकेपर्यंत पसरला आहे. धुंधुक्याचे पुढे भीमनाथ महादेवाचे स्थान आहे. ह्या प्रांताची लांबी सरासरीने दोनशे कोस आहे. याच्या ज्या भागांत द्वारका आहे यास उखामंडल ह्मणतात. हा भाग वाघेयांच्या बंडांपासून उजाड व उध्वस्त झाला आहे. तेथे इंग्रजांची छावणी आहे. काठेवाडचे सर्व राजांस ठाकोर असें ह्मणतात. त्यांत कचित् कोणास राणा, कोणाला जाम कोणाला नवाब असे किताब आहेत. पारेबंदरचे राजास राणा असा किताब असून, जामनगरच्या राजास व जुनागएचे राजाम अनुक्रमें जाम व नबाब असे किताब आहेत. ह्या राजांचे दरबारांत नागर जातीच्या ब्राह्मणांचे फार महत्व आहे. अकबर बादशाहाने ह्या प्रांतांतील गुजराथी वाद.