पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२ ) विसर्जन करून ते मोक्षास गेले. या डोंगराखालीं शत्रुनी नावाची नदी आहे. तशीच गिरनाराखाली सौंदारिक ऊर्फ सवर्णरेखा नांवाची नदी आहे. गिरनार येथील श्रावक लोकांना पालीठाण्याच्या ठाकुरास प्रतिवर्षी १५००० रुपये कर द्यावा लागतो. हा करभार श्रावक लोकांतील महाजन लोकांकइन पोहोचतो. गिरनार प्रांतांत शिवाची व स्वामी नारायणाची देवालये बहुत आहेत. तेथे भीमसागर नावाचा एक जीवंत पाण्याचा विस्तीर्ण तलाव आहे. कोडीनार, हे एक बंदर असन यालाच मूळद्वारका असे ह्मणतात. सोरटी सोमनाथ ऊर्फ प्रभास, पाटण वगैरे याच प्रांतांत आहेत.सोरटी सोमनाथ येथे मुसलमानांनी धामधूम करून तेथील देव काढून टाकून तेर्थे एक मशीद बांधिली, व ती अद्यापि कायम आहे. पुढे अहिल्याबाई होळकरणीने त्या देवाची पुनः गांवांत स्थापना केली, सांप्रत ह्या देवाकडे श्रीमंत गायकवाड सरकाराकडून ४ गांव इनाम आहेत. गिरनार. ध्या पुढे गुप्तप्रयाग तीर्थ आहे. तेथन पढे फिरंग्यांचे दिव बेट आहे. त्याध्यापुढे जाफराबाद नांवाचे गांव असन,तें जंजीन्याच्या नवाबचे ताब्यात आहे. पुढे विष्णु प्रयाग व शिव प्रयाग अशी दोन कुंडे आहेत, ह्यांपासून थोडे पुढे गेले झणजे प्राची सरस्वती नांवाची नदी लागते. ह्या नदी, पाणी फार विषारी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणीही यात्रेकरू रहात नाही. तेथून पुढे नदीत एक मूर्ति उभी केलेली आहे. ह्या मूर्तीला अधरमा यत्र असें नांव आहे. पुढे गोरखमठी नांवाचा एक गांव आहे. ह्या गांवांत कानफाटी लोकांची वस्ती आहे. ह्या गावापासून थोड्या अंतरावर पोरबंदर झणजे सदामपुरी आहे. येथे मदाम्याचे देऊळ आहे. तेथून पलीकडल्या बाजूस माधवपूर ह्मणन एक गांव आहे. ह्या गांवांत भगवान श्री कृष्ण व रुक्मिणी ह्यांचे लग्न झाल्याच्या साक्षीची जागा आहे तेथन पुढे गोनती द्वारका आहे तेथे विश्वकाने श्री भगवंताचे देऊळ बांधिल आहे अने ह्मणतात. पढें गोपीतलाव आहे. त्यांत औरसंचारस ४ कोम जागेत गोपीचंदन सांपडते. तेथून पुढे बेट द्वारका असून तिच्या आलीकडे आरनडा मणन एक गांव आहे. ह्या ठिकाणी गायकवाडाचा शिपाई तप्तन्द्रा देतो. गोमती द्वारकेंत शंकराचार्यांचा शारदामठ आहे. बेट द्वारकत वल्लभाचार्यांचे वंशज गोसावी महाराज यांचा धर्मसंबंधांत अधिकार चालतो. तेथे