पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ प्रस्तावना. सुराष्ट्र देश हणजे, ज्यास काठेवाड ह्मणतात, तो होय. हा देश फार प्राचीन काळापासून सुप्रसिद्ध आहे. प्रथम ह्या देशांत भगवान् श्री- कृष्ण येऊन राहिले. श्री कृष्णाचे झणजे यादवांचे कुळ बुडाल्यानंतर अ. नेक जातीचे रजपूत लोकांची त्या देशांत वस्ती झाली. राजपुतान्यांत वाघेर, जाडेजा, चूडासमा, झाला,जेटवा,गोहेल, काठी,वाठा,अहीर वगैरे जाति येऊन राहिल्या. वरील जातींची ज्या ज्या प्रांतांत वस्ती झाली स्या या प्रांतास त्यांची नांवें पडली. भावनगर वगैरे ज्या प्रांतांत गोहेल रजपुतांची वसाहत झाली, त्या भागास सोहेलवाड असें ह्मणतात. ज्या प्रांतांत झाला नांवाचे रजपूत राहिले, यास झालावाड असें ह्मणतात. काठी लोक ज्या प्रांतांत राहिले, त्यास काठेवाड, असें ह्मणतात. त्याचप्रमाणे जामनगर, पोरबंदर, द्वारका वगैरे गांवांस, यांत अनुक्रमें जाडेजा, जेटवा, घाघेर वगैरे लोकांनी वस्ती केली ह्मणून तशी नांवे पडली. सराष्ट्र प्रां- तांत वल्लभीनगर नांवाची पूर्वी एक राजधानी होती. ही राजधानी काही दिवस सुरळीत चालून पुढे नाश पावली. त्यानंतर लहान लहान अशी पुष्कळ राज्ये उत्पन्न झाली. सायला नांवाच्या गांवी ठाकूर लोकांची व- स्ती आहे. ह्या गांवांत लाला भगत नांवाच्या कोणा साधुपुरुषाची जागा आहे. हा भगत सांप्रत मयत असून याची परंपरा चालत आहे. सायल्यापुढे तुळशीशाम झणून एक स्थल आहे. तेथे ऊन पाण्याची पांच कुंडे असून एक देऊळ आहे. या प्रांतांत पालीठाणे ह्मणून एक राज्य आहे. ह्या राज्याची राजधानी पालीठाणेच आहे. ह्या राजधानीच्या जवळ एक डोंगर असून, त्यावर कोडों रुपये खर्च करून श्रावक लोकांनी देवळे बांधली आहेत; व ते लोक, हिंदुलोक जशी काशी हें एक पवित्रस्थल समजतात, तसे या डोंगरावरील स्थल मानतात. त्याचप्रमाणे गिरनार येथेही श्रापक लोकांची देवळे आहेत. असें ह्मणतात की, श्रावक लोकांचे ऋषभनाथ आदिकरून जेवढे तीर्थंकर होऊन गेले, तेवध्यासान्यांनी वरील डोंगरावर आपल्या देहावें