पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वरून असे अनुमान निघते की, मेर लोक जेटवा रजपुतांनी जित झणजे जिंकलेले असावेत. रजपताच्या मुलात मुलगी मिळण्याची एखादे वेळेस अडचण पडली तर मेराच्या कन्येबरोबर त्याचा विवाह होतो. मेर लोक गुरे राखतात, व शिपाइगिरीही करतात. मेरांमध्ये अमुक एक प्रकारचा विशेष धर्म त्यांनी पाळलाच पाहिजे असा नियम किंवा विधि नाही. ते सर्व प्रकारची मांसे खातात. फक्त हिंदुराजांनी अमुक जनावरांची मांसें खाऊ नयेत असा नांव घेऊन ज्यांचा प्रत्यक्ष निषेध केला आहे तेवढी मात्र मांसे ते खात नाहीत. त्यांचा मुख्य देव बिलनाथ नांवाचा आहे. शिवाय हे हरसदमाता व गिरनार डोंगरांतील तुळशीशाम ह्यांसही देवाप्रमाणे मानतात. गिरनारावर शामजीची मूर्ति आहे, व ऊन पाण्याची बहुत कुंडे आहेत. प्रभास पाटणांत चावडा रजपूत रहात असतां त्यांजवर वरुणदेवाचा कोप झाल्यामुळे त्यांचा नाश झाला, असा एके ठिकाणी उल्लेख आहे. त्याचा अर्थ इतकाच दिसतो की, प्रभास पाटणचे बंदरांत आरव लोकांची जहाजें येत, ती चावडा रजपूत नेहमी लुटीत. त्यामुळे आरखांस संताप येऊन त्यांनी संधि साधून चावडा रजपुतांचे पारिपत्य केले असावे; व हे आरब समुद्रांतून आले मगून त्यांत वरुणदेव ह्मणत असतील, ही गोष्ट इसवी सन ७०० त घडलो. चावडे रजपुतांचा पटण (प्रभास) येथे नाश झाल्यानंतर अवशिष्ट राहिलेले लोक पटणाहन निघन,राधनपर इलाख्यांतपंचासर झगन एक भाग आहे तेथे गेले. या भागास वढियार प्रांत हणतात. गजराथेंताल प्रांतांस जुनी नांवें याप्रमाणे आहेत:-अमदावादेचे पश्चिमेस भाल, पूर्वेस पाल, व दक्षिणेस चरोतर ; चरोतरच्या खालच्या बाजूस कानद व त्यांतच भडोंच आहे. काठेवाडांत चोखाडय़ांत, सुवाळकाकरेज, टेंढार, गोहेलवाड, झालावाड वगैरे ; याप्रमाणे जनी नांवे आहेत. कोणी राधनपुरासच बढियार मणतात.तेथे चावडा लोकांचे राज्य होते.त्यांच्या राजाचें नांव जयशेखर किंवा जसराज असें होतें.राधनपुराकडे जेव्हां चावडा रजपुतांचे राज्य होते त्या वेळेस दौलताबादेजवळ कल्याणी नांवाचे मोठे भरभराटीचे शहर होते. तेथे भवड सोळखी नांवाचा राजा राज्य करीत होता. या राजाचे राज्य विस्तीर्ण होते खरे; तथापि, गुजराथेतील एकही भाग त्याच्या हाती नव्हता. इसवी सन