पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९६ त शंकर बारवट नांवाचा कोणी भाट गजरायतन कल्याणीस गेला, व तेथील राजाची याणे भेट घेतली. राजाने तुह्मी कोठोल, काय, वगैरे प्रश्न केल्यावरून भाटाने सांगितले की, मी जयशेखर चावडा याचे राज्यांत असतो. हा भाट ( कवि ) परराज्यांतील आहे. असे समजल्यावर भूवड राजाने आपला आश्रित कवि कामराज याजशी त्याचा सामना करून वादविवाद करविला. त्या वादविवादांत कामराज कवीचा पराभव झाला. आपल्या आश्रित कवीचा पराभव झालेला. पाहन भवडराजास अयंत क्रोध आला व त्याने प्रधानास हांक मारून ह्मणाला की, दिवाणजी, तुह्मी एक वेळ मजपाशी बोलला होता की, गुजराय प्रांत सर केला; परंतु पंचासरचे राज्य हस्तगत झाले नाहीसे वाटते. तेव्हां प्रधान ह्मणाला की, होय महाराज, तेवढे राज्य मात्र तशाच कांहीं अनिवार्य कारणाने काबीज करून घ्यावयाचे राहिले आहे. भवडाने प्रधानाच्या तोंडचे ते उत्तर ऐकतांक्षणी लागलेच स्वारीची तयारी करण्यास सांगितले, व स्वारीचा मोर्चा पंचासराकडे देऊन तें हरप्रयत्नाने हस्तगत करावें, ह्मणून हुकम दिला. भूवड राजा पंचासरवर स्वारी करणार, ही बातमी शंकर कवीला समनल्याबरोबर तो तेथन निघाला ; व भूवडाचे सैन्य येण्याचे पूर्वीच तो पंचासर येथे पोहोंचून त्याने तेथील राजा जो जयशेखर त्यास भवड राजाच्या हेतची सर्व कच्ची हकीकत कळविली. जपशेखराने ही परचक्राची बातमी ऐकून तो आपल्या सैन्याची व्यवस्था करण्यास लागणार इतक्यांत भवड राजाचे सैन्य येऊन पोहोचलें ; व त्याने पंचासरास वेढा दिला. मग कशाची व्यवस्था आणि कशाची तयारी ? लागलेंच शत्रशीं तोंड देणें जयशेखरास भाग पडले. युद्धास आरंभ झाला तेव्हां भवटाचे सैन्याचा सेनापति मीर नांवाचा सरदार हाता; आणि जयशेखराच्या सैन्याचा सेनापति सरपाळ नांवाचा होता.उभय सन्याच १२ दिवस युद्ध झाले. जयशेखराची कोणत्याही प्रकारे तयारी नसून त्याचे सैन्य इतक्या नेटाने लढले की, भवडाकडील वेदपरमार नावाचा सरदार पळून गेला; चंद मरण पावला व आणखी एक सरदार जखमा झाला; परंतु अखेरीस जयशेखराची फौज थकली. आपले सैन्य हतबल वश्रांत झालेले पाहन जयशेखराचो पांचावर धारण बसली.तरा यान निराश न हाता, आपल्या पर्ण मामाच्या गरोदर स्त्रीला तिच्या भावास लणन आपल्या सेनापतोस बरोबर देऊन दर एका जंगलांत नेऊन ठविलें।