पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वल्लभीवंशांत कनकसेन राजा झाला त्याच झणजे इसवी सन १००चे सुमारास नागार्जुन झाला; आणि ज्या सुमारास वल्लभी घराण्यांत शिलादित्य राजा झाला त्याच झणजे इसवी सन ६०४ च्या सुमारास जेटवा रजपतांत शिरकुमार राजा झाला. एका वंशांत आदित्य नांवाचे राजे झाले, व दुसरे वंशांत कुमार नांवाचे राजे झाले; परंतु, हे उभयतःही, जे शक लोक हिं स्थानांत आले, त्यांपैकीच असावेत असे अनुमान आहे. अहोर लोक सिंधु देशांत रहात असत व ते,आपण सिंदेकडून आल्याचे स्वमुखाने कबूलही करतात. हे अहीर, वारी व बाबरिया लोक इसवी सन ७०० चे समारास पाटण प्रांती व काठेवाड प्रांतों आले. अहिरास पर्वी अभीर असें म्हणत होते. पूर्वी तालमी नांवाचा प्रसिद्ध भूगोलशोधक होऊन गेला, त्याणे आपल्या लेखांत एके ठिकाणी, सिंधु देशांत अहिरिया लोक होते, असे लिहिले आहे. त्यावरून हे अहिरिया आणि नुक्तेच वर कळविलेले अहोर हे एकच असावेत. विष्णुपुराणांत असे लिहिले आहे की, आंध्र राजाचे कारकीर्दीत सिंधु देशांत म्लेंच्छ व सुराष्ट्रांत शूद्र आणि गाई चारणारे लोक रहात असत. पुढे इसवी सन ७०० च्या सुमारास जेव्हां मुसलमानांची गर्दी सिंधु देशाजवळ येऊन पोहोचली, तेव्हां कांही अहोर लोक बाटले, व कांहीं सुराष्ट्र प्रांती पळून गेले. मुसलमानांच्या धिगाण्यांत अशा प्रकारची वाटावाटी व पळापळी होण्याचा संभव होता; व तो खरा असेल तर म्लेंच्छ झणजे मुसलमानच समजले पाहिजेत. देवल नामक ऋषि सिंधु नदीचे तीरावर रहात असे. त्याणे, मुसलमानांनी जबरीने बाटाविलेल्या ब्राह्मणो ब्राह्मणांनी कशा शुद्ध करून घ्याव्या याविषयी आत्मकर्षक झणजे देवलनांवाच्या स्मृतीत फार सुलभ शास्त्रार्थ लिहिला आहे, त्यावरून सिंदेश त्या काळी म्लेंच्छांनी ह्मणजे मुसलमानांनी घेरला असावा असे दिसते. भारतांत असे लिहिले आहे की, हस्तनापुराचे पश्चिमेस अभार लोक राहतात; आणि प्राचीनकाळी पाटणवाडा व बरड्याचे डोंगरांत भील कोळी वगैरे जंगली व रानटी लोक रहात होते; व त्याच डोंगरांत मुतें रहात होती असें भाट लोक आपल्या ग्रंथांत लिहितात. या भुतांतील जी मुख्य भुते त्यांची वर्णनें भाटांनी " बाबरिया भुतें" या संज्ञेने आपल्या ग्रंथांत केलेली आहेत. फार प्राचीन काळच्या लोकांचे अनार्य, दास, दस्यु, राक्षस, पिशाच, असुर, वगैरे शब्दांनी पुराणांत वर्णन करण्याची ज्याप्रमाणे