पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फार पूर्वीची आहे असे सांगतात. जशी सूर्यापासून शिलादित्याची उत्पत्ति झाली; कुंतीपासून पांच देवांचे अंशभूत जसे पांडव उत्पन्न झाले, त्याचप्रमाणे कुंतीला कौमार्यावस्थेत सूर्यापासून कर्ण नांवाचा मुलगा झाला होता. ह्या कर्णाला वृत्तकेत नांवाचा एक मुलगा होता. हा वृत्तकेत भारती युद्धांत होता; परंतु वंश नष्ट होईल ह्मणन यास माघारी परतविलें. ह्या वृत्तकेतास गजराथेत "वाळा"असा शब्द आहे; व त्याचेच आम्ही वंशज आहों असे त्यांचे झणणे आहे. आणि वृत्तकेताच्या गुजराथेतील नांवावरून या वंशीयांस तेंच झणजे “वाळा" असे नाव पडले आहे. ह्या कुलकथेविषयी भाट असें ह्मणतात: वृत्तकेते वंश उजळ्यो ज्याहाभिवाळा जात कौरवो ये कुळ खोयु आण राखी अख्यात. वृत्तकेताच्या वंशीयांचे राज्य पूर्वी गंगायमुनातीरी होते. तेथून ते पुढे माळव्यांत मांडवगडास आले. यानंतर ते तो मुलख सोडून काठेवाडांत बाळा ह्मणून गांव आहे तेथे आले. त्या वेळेस सुराष्ट्र देशाचाही काही भाग त्यांचे ताब्यांत होता.. घेलोत रजपुतांचे कुळवर्णन करणारे भाट असें ह्मणतात की, बल्लभीपूरचा नाश झाला त्या वेळेस त्याचा शेवटला राजाशलादित्य हा मरण पावला; तेव्हां त्याची स्त्री पुष्पावती ही गर्भिणी असून, ती अंबाजीचे डोंगरांत आराखडीर गांवीं नवस फेडण्यास गेली होती. तेथे तिला आपला नवरा मेल्याचे व त्याचे राज्य गेल्याचे वर्तमान कळले. तेव्हा तिला अतिशय दुःख होऊन तिने सहगमन करण्याचा विचार केला; परंतु त्या वेळेस ती गभिणी असल्यामुळे तसलें साहस तिला करितां येईना. तेव्हां तिने असा निश्चय केला की, आपली ही पराधीन स्थिति नाहीशी होईपर्यंत शहरांत किंवा कोणत्याही मनुष्यवस्तीत न जातां, अरण्यांतच कंदमूले भक्षण करून दिवस काढावे व गर्भस्थ जीवाच्या ऋणांतून अंशतः मुक्त होऊन नंतर आपल्या जीवाचें सहगमनाच्या योगेंकरून सार्थक करावें. याप्रमाणे दृढ निश्चय करून ती त्याच रानांत एक गुहा पाहून तीत राहिली. पुढे कालांतरानें गर्भाचे पूर्ण दिवस होऊन ती पुत्र प्रसवली. ह्या पुत्राचे जन्म गुहेत झाले ह्मणून त्याचे नांव गुह असे पडले. गुह दिवसांमासां मोठा झाल्यावर राणीने त्यास विद्याभ्यासाकरितां एका विद्वान् ब्राह्मणाच्या स्वाधीन करून आपण आपल्या पूर्व संकेताप्रमाणे सती गेली.