पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) देवीने भाटाच्या तोंडून सर्व हकीकत ऐकून घेऊन जेटव्याचा सर्व इतिहास भाटाला सांगितला, व तो त्याने लिहून घेतला. देवीने भाटाला आणखी असें सांगितले की, मी नुक्ताच कळविलेला इतिहास जरी खरा आहे तरी ते. वढ्याने जेटव्यांचे कुल कोणत्याही प्रकारें निंदेस पात्र नाही. आणि एवब्याकरितां तूं जो इतिहास लिहून घेतला आहेस तो लोकांस खरा वाटावा ह्मणून मी आपल्या हातची त्यावर काही खूण करते, असें ह्मणून भाटाने लि. हिलेल्या इतिहासावर देवीने एक अमानुष चिन्ह करून सांगितले की, आतां हा इतिहास मेवाडच्या राण्यास नेऊन दाखविशील तर तो आपली कन्या तुझ्या यजमानास देण्यास हरकत करणार नाही. भाट देवीची आज्ञा घेऊन निघाला तो पुनः मेवाडच्या राण्याकडे येऊन त्यास त्याने तो इतिहास दाखविला. तो पाहून राण्याने तत्काल आपली कन्या देण्याचे कबूल केलें. हीच दंतकथा इतिहासकार भाटांनी आपल्या ग्रंथांत लिहन ठेविली आहे. तेव्हां या इतिहासावर कितपत विश्वास ठेवावा याची शंकाच आहे. जेटवा या शब्दांतील मळ जो जित शब्द याचा अपभ्रंश जाट असा होऊन, सुराष्ट्र देशांत जाट याचा अपभ्रष्ट शब्द जेटवा असा झाला. जेटवे रजपूत है जित लोकांतीलच आहेत असें डाक्टर विलसन यांनी लिहिले आहे. जित लोकांची प्राचीन राजधानी काश्मिरांत श्रीनगर नांवाचे शहर होतो. जित हे सूर्योपासक होते. त्यांनी आपल्या राजधानीत सूर्याचे देऊळ बांधिले. हे देऊळ पुलकुमार राजाचे कारकीर्दीत झाले. शक राजांचे जे शिक्के सांपडतात त्यांजवरही “ कुमार " असें नांव सांपडते. जेटवे राजांमध्येही कुमारपदधारी पुष्कळ राजे होते असें भाट हणतात. जेटवे हे ढाका प्रांती राहत असत. इसवी सन १००चे सुमारास जेटवे राजांपैकी महा बलवान् नागार्जुन नांवाच्या राजाची व शककर्ता शालिवाहन किंवा शातवाहन राजाचा लढाई झाली असें भाटांचे ग्रंथांत लिहिले आहे. इसवी सन ७००त जटव्यांचा राजा शिलकुमार याचे कारकीर्दीत दलिमली येथे एक किल्ला बांधला गेल्या. त्या शिलकुमार राजाने दिल्लीचा राजा अनंगपाल यास एके प्रसंगी साहाय्य केल्यावरून अनंगपालाने त्यास आपली कन्या देऊन जामात केला. वाळा रजपूत हे आपल्यास बल्लभी नगरचे राजवंशीय झणवितात; परंतु, वंशावलीच्या गोष्टी एखादे वेळेस निघाल्यास ते आपल्या वंशाची उत्पत्ति