पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दंतकथा सांगतात की, सीताशुद्धीच्या वेळेत मारुतीने समुद्रोडान केले, त्या वेळेस त्यास घाम येऊन त्याचा एक बिंदु एका मगरीचे तोंडांत पडला. त्या वीर्यमय घर्मविंदपासून ती मगरी गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. त्याचे नांव मकरध्वज. तो आमचा मूळपुरुष होय असे ते ह्मणतात. हा मकरध्वज अहिरावणमहिरावण यांचे घरीं पहारेकरी होता.रामचंद्रांनों आहेरावणमहिरावणांचा वध केल्यानंतर मकरध्वजाला सुराष्ट्र देशाचे राज्य दिले. या मकरध्वजाचे वंशीयांस ह्मणजे पोरबंदरच्या राजांस पुच्छधारी राजे ह्मणतात. असें ह्मणतात की, या वंशांतील एके राजास खरेंच पुच्छ होते! वस्तुतः पाहतां ही गोष्ट असंभाव्य आहे; तथापि ती खरी मानणारे भोळे व भाविक लोक ह्या देशांत पुष्कळ आहेत.स्थलचर प्राणी जो वानर त्याच्या धर्मबिंदूपासून जलचर प्राणी जी मगरी तिला गर्भधारणा होणे हेच असंभवनीय; आणि मनुष्य संतति होणे हे तर त्याहूनही असंभवनीय! ही असंभवनीयता लहान मुलासही सहज समजण्यासारखी असून, पोरबंदरचे राणाजी यांस ती संभाव्य वाटते इतकेंच नाहीं; तर वानरापासून मगरीला झालेल्या मनुष्य संततीचेच आमो वंशज आहोत असे ते मोठ्या अभिमानाने व आध्यतेने सांगतात, व त्यांच्या मूलोत्पत्तीचे त्यांस मोठे भूषण वाटते! भाटांनी या जेटवे कुलाच्या उत्पत्तीचा संबंध रामायणापर्यंत नेऊन मिळविला आहे; व तिला दाळ येण्याकरिता त्यांनी आणखी अशी एक दंतकथा लिहिली आहे की, या जेटवा जातीच्या एका राजाने मेवाडच्या राण्याकडे त्याची कन्या मागण्पाकरितां आपला भाट पाठविला. तेव्हां मेवाडच्या राण्याने उत्तर दिले की, ज्या वंशाचा पिता वानर आणि माता मगरी या वंशांत मी आपली कन्या देऊ इच्छित नाही. कन्या मागण्याकरितां गेलेल्या भाटाला रापाचे हे उत्तर ऐकून अतिशय वाईट वाटले. तो त्या दुःखावेशांत खरडा येथे गेला ; आणि तेथे असलेल्या जेटव्यांच्या हर्षदमाता नांवाच्या कुलदेवीपुढे आणला जीव देग्यास उद्युक्त झाला. तेव्हां देवी प्रसन्न होऊन तिने भाटाला प्रत्यक्ष दर्शन दिले ; आणि विचारले की, तूं आपल्या जिवावर कां उदार झालास ? देवीचा प्रश्न ऐकून भाटाने सर्व इतिवृत्त देवीला विदित केले ; आणि मणाला की, मेवाडच्या राजाने माझ्या यजमानाची केलेली मानखंडना मा आपल्या तोंडाने जाऊन सांगण्यापेक्षां यजमानाला तोंडच दाखवू नये हे मला बरे वाटते; आणि ह्मणूनच मी हे साहस करण्यास तयार झाला आहे.