पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाने मारलेल्या गप्पा त्या वेळच्या राजांस खऱ्या भासून, ते मोठी शेखी मिरवीत; व त्यांतच आपला थोरपणा मानीत. मग, या आश्रितांनी तरी कशाला कमी करावें ? राजा रामचंद्र ब्राह्मणाच्या शापाने जन्मला; परीक्षित ब्राह्मणाच्या शापाने मेला; समुद्र ब्राह्मणाला भ्याला ; सूर्य ब्राह्मणाच्या भीतीने लपून राहिला; ब्रह्मशापाने चंद्रास क्षय लागला; सपांच्या जिभा फाटल्पा; समुद्र कोरडा पडला; सूर्यास कन्या झाली; गंगानदी स्त्रीच्या रूपाने ब्राह्मणाच्या घरांत शिरली; यमुनेचें यमाशी नाते जडले; इत्यादि मतलबी लेख ब्राह्मणांनी प्रसिद्ध केले व त्यांवर भोळ्या व भाविक लोकांनी विश्वास ठेविल्यामुळे सर्वत्र अज्ञान पसरून हा देश अंधकारमग्न झाला. कोणाच्याही मनांत खरा व संभवनीय तर्क बांधण्यास जागा राहिली नाही. जिकडे तिकडे अज्ञानाचे साम्राज्य होऊन, सर्व लोक लहान मुलांसारखे परसूत्री झाले ब अज्ञानांवकारांत चांचपडत राहेिले. पूर्वापर संबंधाचा कोणाला ठिकाणा लागेनासा झाला. साहस, शौर्य, धैर्य, ब्रम्हचर्य, इत्यादि गुणांचा अभाव झाला. विद्येविषयींची अभिरुचि नाहीशी झाली. तेव्हां, अशा प्रकारच्या विपरति कालांत खरा इतिहास कोण लिहून ठेवितो ? एखादे नदीचें. मूर्तीचें, व क्षेत्राचें माहात्म्य लिहिले तर निर्वाह चालेल पोरेबाळे दानदाक्षणा मिळवितील, या हेतूने अर्थात खरा वृत्तांत लिहिण्याविषयी अनास्था झाली. आणि हेही खरेच. सत्यप्रतिपादन केले असतां स्याबद्दल जर कोणी दक्षिणा देत नाही किंवा संभावना करीत नाही, अगर अन्य त-हेनें प्राप्ति होण्याची अशा नाही, तर सत्यापलाप व असत्यप्रतिपादन होणे साहजिकच आहे ! आण अशा प्रकारचा मतलबी विचार, त्या बेळचे लोक अज्ञानांत बुडून गेले असल्यामुळेच त्यांच्या हाडाशी खिळला नाऊन त्यांच्या हातून खरा इतिहास लिहिला गेला नाही. हिंदुस्थान देशांत पूर्वी बाळा, चौरा, जेटया, अहीर, श्वारी, मेर, बाबरिया, भील, कोळी वगैरे लोकांची वस्ती होती. वर लिहिलेल्या सर्व मातींच्या लोकांनी पृथक् पृथक् प्रांत वसविले आहेत ; व त्यांची नांवें:पोवाड, मेवाड, बावरियावाड, भीलवाडा, कोळवाण, वगैरे त्या त्या लोकांच्या नांवावरून पडली आहेत. या लोकांना जिंकणारे व त्यांजवर अम्मल बजावणारे मौर्यवंशीय, यानवंशीय, शकवंशीय, गुप्तवंशीय, शिलादियवंशीय वगैरे बहुत राजे होऊन गेले. हे राजे याच जातीत उत्पन्न झाले