पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) किंवा कसे, याचा मात्र पत्ता लागत नाही. परंतु सुराष्ट्र प्रांती हल्ली ने रजपूत आहेत ते शकलोकांतून, बारबर व अभीर लोकांपासून रखारी,मेयर, बावरिया वगेरे उत्पन्न झाले असावे, अशाविषयींच्या संबंधाचा कचित् ठिकाणच्या लेखांत धागादोरा मिळतो. भाट लोकांनी रजपुतांचा वंशत, सूर्य, चंद्र, इंद्र, ब्रह्मा आदिकरून देवांपर्यंत नेऊन मिळविला असून, त्यांची दानशूरता ठिकठिकाणी फार वाखाणली आहे. भाटांनी आपल्या ग्रंथांत रजपूत वंशाची नांवे लिहिली आहेत ; परंतु अमुक वंश अमक्या शकांत किंवा संवतांत झाला, अशाविषयी मात्र कोठे खुलासा केलेला आढळत नाही. ह्यावरून इतके सिद्ध होते की, भाटांनी आपल्यास उत्तम बक्षिसे मिळावी ह्या हेतूने आपले यजमान जे रजपूत राजे त्यांची व त्यांच्या पूर्वजांची मन मानेल तशी कीर्ति व स्तुति वर्णिली आहे ; आणि शकाचे किंवा संवताचें दिग्दर्शन न करण्यांतला मतलब हा की, कधी काळी कोणी पडताळा पाहूं लागल्यास तो त्यास लागू नये. रजपुतांचे मुख्य वंश चार आहेत. ते:१ परमार (पोवार); २ चोव्हाण (चव्हाण); ३ सोळंखी (साळुखी) आणि ४ परिहार, याप्रमाणे आहेत. रजपुतांच्या या चार मुख्य वंशांविषयी चंदभाटाचें असें ह्मणणे आहे की, जेव्हां पृथ्वीवरील क्षात्रबीजाचे निर्मूलन झाले, आणि जिकडे तिकडे इतर जातींचे राजे होऊन अधर्मप्रवृत्ति झाली, तेव्हां वसिष्ठ ऋषीने, धर्माची पुनःस्थापना करणारे कोणी धर्मशास्ते पुरुष उत्पन्न करण्याच्या इच्छेनें आवूपर्वतावर यज्ञ केला; आणि त्या यज्ञकडांतन वर लिहिलेले चार जातींचे क्षत्रीय पुरुष उत्पन्न केले. ह्या चार जातींच्या क्षात्रयांच्या साहाय्याने ब्राह्मणांनी म्लेंच्छ लोकांस भरतखंडांतून हांकून दिले व वैदिक धर्माची स्थापना केला. ह्या दंतकथेतील माथतार्थ एवढाच दिसतो की, या देशांत तीनशे इसवीपूर्वी बौद्धधर्माचे प्राबल्य फार वाढले. तेव्हां, ब्राह्मणांनी ठिकठिकाणी व प्रसंगापात्त क्षत्रियांची मदत घेऊन त्या धर्मचा पराजय केला. यान, शक, गुप्त,वगैरे जे राजे झाले ते बौद्धधर्म पाळीत होते, त्यामुळे, यांस वर्णसंकराचा विवि निषेध नव्हताच, तेव्हां अर्थात चंदभाटाने त्यांस म्लेंच्छ असे मानले असेल. बौद्धधर्माचे वर्चस्व होणे हाच कलियुगाचा प्रभाव असें ब्राह्मण मानीत असल्यामुळे यांनी “मूले कुठार;" या न्यायाने प्रथम त्या धर्माचें खडन केले. नंतर कांही कालाने यवन, शक वगरे राजांच्या जातीचे जे राजे झाले त्यांचे व