पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७) कसा होता, एकंदर पृथ्वीवर कोणकोणत्या धर्माचे व जातीचे लोक राहतात, इत्याद गोष्टींचे अंशतः प्रत्यक्ष दर्शन व तर्काचा साक्षात्कार होऊन, त्यांच्यांत काहीशी हालचाल व चळवळ सुरू झाली आहे. आतां ही चळवळ व हालचाल या भरतखंडास कोणत्या योग्यतेला नेऊन पोंचवील हे आतांच निश्चयाने सांगवत नाही हे खरे; परंतु हल्ली सुरू असलेली चळवळ चढत्या प्रमाणावर अशीच अखंड चाल राहोल तर निश्चयाने 'घटीयंत्र'न्यायाने रितें मडके भरल्यावाचन राहणार नाही. ह्मणजे, आपल्याला व आपल्या देशाला प्रस्तुत प्राप्त झालेली उतरती कळा नष्ट होऊन, चढती कळा आल्यावाचून राहणार नाही. पण, प्रयत्नांत मात्र कसर होतां उपयोगी नाहीं.. भाग २ रा. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाविषयी जो कांहीं सप्रमाण वृत्तांत सांपडला तो, मौर्य, यवन, शक, गुप्त, व बल्लापूरचे राजे झाले, त्यांच्या कारकीर्दीपर्यंत व,झणजे इसवी सन७००पर्यंत दाखल केला. इसवी सन७०० च्या पुढे पटणास मोठे राज्य स्थापन झालें, तोपर्यंत लिहिण्यासारखा व विश्वसनाप इतिहास सांपडत नाही. भाट लोकांजवळ कांहीं ऐतिहासिक लेख आहेत. खरे; परंतु ते त्यांनी आपापल्या यजमानांस खुष करण्याकरितां व त्यांचा मान वाढविण्याकरितां अतिशयोक्तीने व मनासोक्त रीतीने लिहिलेले असल्यामुळे त्यांजवर भरवसा ठेवितां येत नाही.ब्राम्हणांस संतुष्ट राखण्याकरितां सर्वांनी झटावे ह्मणन, व त्यांचे, त्यांच्या शापांचे आणि त्यांच्या आशीर्वादांचें माहात्म्य वाढविण्याकारिता झणून, ज्याप्रमाणे पुराणे लिहिली आहेत, व त्यांवर विलकूल विश्वास ठावता येत नाही, त्याचप्रमाणे भाटांनी लिहीलेल्या ऐतिहासिक ग्रंथांची व्यवस्था आहे. हा कोण? सर्याचा पुत्र हा कोण ? चंद्राचा पुत्र; हा कोण ! वायूचा पुत्र ; हा कोण ? शेषाचा अवतार ; अमकी कोण ? नागकन्या तमकी कोण ? पर्वताची कन्या फलाना कोण ? शंकराचा मुलगा ; ढिकाणा कोण? यमाचा पुत्र इत्यादि हव्यातशा गप्पा ठोकण्यांत त्यांस किचित् सुध्दा शंका वाटली नाहीं; व त्यांचे वंशजांनाही अद्यापपर्यंत वाटत नाही. अमका राजा कोणाचा वंशज ? सर्याचा तमका राजा कोणाचा वंशज ! इंद्राचा ; या व अशाच प्रकारच्या इतर " वचने का दरिद्रता ?" या