पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३६) लागले; अन्यायाचे व बाष्कळपणाचे प्रघात पाटन, शिमग्यासारखे बीभत्स सण प्रचारांत आणिले, आणि त्यांत निर्लज्जपणाने मनसोक्त व्यापार करूं लागले; गतभतृकांचे केशपवन कल्न त्यांतच सोवळेपणा मानू लागले मुलांची लहानपणी लग्ने करून सर्व प्रजा निःशक्त व निर्यि करून टाकली आपसांतील उत्कर्ष महन न होऊन ते चाहाडखोर बनले परकीय राजांस सामील होऊन त्यांजपुढे गोडा घोळं लागले; त्सा परकीय राजांनी तरी, आपल्या पायाने आपल्या घरी चालत आलेल्या लक्ष्मीस पाठ कशी द्यावी ? मग, त्यांनीही ह्यांनी गोड बोलून व ह्यांच्या पोटांत शिरून यथेच्छ हात मारून घेऊन आपला स्वार्थ साधला; हे परकीय राजे देशांत घुसल्यामुळे खातीपिती व खानदानीतली अशी शेकडों कुळे देशोधडीस गेली; संपचीचा सर्व प्रकारे व्हास झाला; आपणांस आर्य म्हणविणारे लोकांनी, आपण कोण ? कोणाचे वंशज? आपले पूर्वज कसे व किती विद्वान् होते ? त्यांनी नानाविध शास्त्रांत कशी पारंगतता संपादन केली होती ? त्याचप्रमाणे त्यांनी शास्त्रीय असे केवढाले गहन विचार करून त्यांवर काय, काय ग्रंथ लिहून ठेविले आहेत ? इत्यादि गोष्टींचा शोध करण्याचे सोडून 'चालले आहे तेच ठीक आहे " अशावरच समाधान मानून, काही एक हालचाल न करितां," जसा वारा येईल तशी पाठ दिली पाहिजे," या असमंजस सिद्धांतावर सर्व भिस्त ठेवन ते निरुद्योगी बनले; त्यांच्यांत विद्येविषयी अरुाचे उत्पन्न झाली; विद्वानांचा सन्मान नाहीसा झाला; वेदग्रंथांत सर्व काही भरले आहे अशा वेडगळ समजुतीने ते त्यांचीच घोकंपट्टो करीत राहिले; आणि ज्यास वेद येतात तोच काय तो विद्वान् , असा त्यांचा मिथ्या ग्रह झाला; अशा प्रकारे सर्वत्र अज्ञानांधकार पसरत चालल्यामुळे भंगड, गंजड, अफोमे, वगैरेंची साधूत व योग्यांत गणना होत चालली; बाष्कळ व आपस्वार्थाच्या दंतकथा सांगणारे धर्माध्यक्षतेचा टेंभा मिरवं लागले; प्रजेची अशी निकृष्ट स्थिति झाल्यामुळे तिचे पालनकर्ते राजेही जुलमी, स्वार्थी, दुष्ट, अन्यायी, व लटारू बनले ; लांचखाऊ, त्रासदायक, अप्पलपाट, व हाजी हांजी करणारे असे लोक त्या राजांचे दिवाण व मुत्सद्दी झाल; याप्रमाणे सर्व प्रकारें उतरती कळा लागली. हल्ली इंग्रज लोकाच सहवासान लाकाच काहीसे डोळे उघटन उद्योग कसा करावा, व्यापार कसा करावा, राज्यराति कशी असावी, प्राचीन काळी हा देश