पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बांत कालिका देवीने रूपसंपन्न नवयुवतीचे अवर्णनीय रूप धारण करून बार्षिक संप्रदायाप्रमाणे राजाला दर्शन देण्याकरितां आली असता, राजास मोह उत्पन्न होऊन, सास भान न राहता त्याने देवीची अमर्यादा फेली. त्यामुळे देवी संतप्त झाली व तिणे राजाला शाप दिला की, ज्यापेक्षां तं इतका अविनीत झालास त्यापेक्षां तूं आपल्या राजधानीसुद्धा नाश पावशील..देवीचा शाप होण्याबरोबर तत्काल त्या शापाचें फल अनुभवास आले. अद्यापपर्यंतही कालिका देवीच्या त्या शापाच्या दहशतीने ह्या शापदग्ध स्थलावर वस्ती करण्यास लोक भितात, अशी भाविक लोकांची समजूत आहे. वास्तविक पाहिले तर अमदाबादेहून मुसलमान लोकांनी चांपानेर शहरावर स्वारी करून त्याचा विध्वंस केला. कालिका देवीचे शापार्ने चांपानेर शहराचा नाश झाला, वगैरे ज्या दंतकथा आहेत त्या, दैविककथानिय लोकांनी नसते स्तोम माजविण्याकरितां, प्रसिद्ध केल्या आहेत. ह्यापेक्षा त्या दंतकथांत अधिक स्वारस्य काही नाही. पर कळविलेल्या कथेसारख्या दंतकथा विश्वसनीय वाटण्याचे कारण अज्ञान होय. फार प्राचीन काली हिंदुस्थानचे लोक महापराक्रमी, ज्ञानसंपन्न, व दीर्घोद्योगी होते हे खरे; परंतु त्या त्यांच्या उच्च स्थितीस आलीकडे सुमारे दोन हजार वर्षे उतरती कळा लागून, त्यांच्या पुढील वंशजांस महानिद्रा लागत चालली; त्यांत नानाप्रकारची पाखंडे, आळस व अशक्तपणा उत्पन्न झाला; तर्कदीप अगदी मालवला; त्यांचे धैर्य, बोर्य व पराक्रम नष्ट होऊन,ते अन्य देशीय लोकांचे तावडीत सांपडत गेले, आपण कोण, आपला देश केवढा विस्तीर्ण, किती सुपीक, किती धनाढ्य, केवळ सुवर्णभमि, किंबहुना प्रत्यक्ष कल्पवृक्षच, हे त्यांच्या ध्यानीमनीही येईनासे झाले; त्यांच्यामध्ये अनेक भेद, फांटाफुटी, वैषम्य व मत्सर ह्यांचे प्रावल्य होऊन ते परस्परांचे शत्रु बनले; विचारशून्य, अज्ञानी व दांभिक काकांनी जे सांगितले ते ह्यांनी विनतकार मुकाट्याने ऐकन, त्यावर विश्वास ठेविला इतकेच नाही तर, त्याप्रमाणे ते वर्तणकही करू लागले; उत्तरोत्तर आपणास वाईट स्थिति कशाने येत चालली ह्याचा दूरवर विचार न करितां, त्यांनी ह्या दु:स्थितीचे व अवदशेचे सर्व निमित्त कालावर ढकललें; कोणी चाल कालास " कलियुग "ह्मणं लागून आपणास दुदशा प्राप्त होण्याचे कारण या कलियुगाचा प्रभाव हेच होय, असे हाणं