पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) काही अपरिहार्य कारणाने आज मित्तोला नामशेष होऊन राहिली आहेत. या नायनाट झालेल्या शहरांचों हल्ली जी खिंडारे आहेत,त्यांतील खुणांवरून पूर्वी त्यांत धनाढ्य सावकारांची मोठमोठी घरे व भव्य आणि विस्तीर्ण अशी देवालये असावीत असे सहज अनुमान करितां येते.ह्या शहरांची वस्ती मोडली तेव्हां त्यांतील जे लोक पळन गेले त्यांनी निरनिराळ्या लहान लहान वस्त्या करून त्यांत ते राहिले; व त्या वस्त्यांत त्यांनी आपल्या इष्ट देवतांची देवळे बांधिली. ती अद्यापि कायम आहेत. बलचिस्थानांतून हिंदुस्थानांत जे क्षत्री आले आहेत त्यांची कुलदेवता हिंगळाजमाता नांवाची देवी आहे. हल्ली जेथे जेथे भंगसाळी क्षत्री आहेत तेथे तेथे या कुलस्वामिनी हिंगळाजमातेची दवेळे बांधिलेली आहेत. या हिंगळाज देवीचे पर्वताबद्दल स्वतंत्र माहितीचे एक मोठे पुस्तक आहे.त्याचें हिंगलादेखंड असे नांव आहे.चांपानेर शहर मोडल्यावर त्यांतील लोक जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी आपली कुलदेवता जी कालिकामाता तिची स्थापना केली आहे. हल्ली लाासिक शहरांत जे कासार आहेत त्यांचे पूर्वज चांपानेरचे मूळचे रहिवासी असावेत असे, त्यांनी त्या शहरांत मल्हारदरवाज्यावाहेर जें,तिजवर कालिकामातेची स्थापना करून मंदिर बांधले आहे त्यावरून अनुमान करण्यास काहीच प्रत्यवाय नाही.मुंबईसहो चांपानेरच्या कासारांची वस्ती आहे,व त्यांची कुलस्वामिनी जी कालिकादवी तिचे पायधुणीवर एक मंदिर वांधिलेले आहे. वडनगरचे नागर ब्राह्मण जेथे जेथे वस्तीस जाऊन राहिले तेथे तेथे त्यांनी आपला कुलदेव लो हटकेश्वर त्याची स्थापना केली. बडनगरास असलेल्या नागर ब्राह्मणांच्या मळ वस्तीचा इतका काही विध्वंस झाला आहे की, ज्या बडनगरांत पर्वी ऐशी हजार नागरांची वस्ती होती त्या वडनगरांत हल्लों नागर ब्राह्मणाचे एकही घर नाहीं । चापानेर तर अगदीच आसार पडले आहे. पावागडावर काही थोडी जुजबी वस्ती असून, त्या वस्तीत पालिकचे देऊळ आहे. त्या देवळाबर हल्लीपिराचे एक स्थान झाले आहे. चांपानेर नगराचा विध्वंस कशाने झाला याविषयी अशी एक दंतकया थाहे की, या नगराचा राजा प्रतिवर्षी कालिका देवीचा उत्सव करीत असे, व त्या उत्सवांत कालिका देवी प्रत्यक्ष दर्शन देत असे. याप्रमाणे कित्येक वर्षे अव्याहत क्रम चालत आला होता. एके वर्षीच्या उत्स