पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नावाची नदी वाहत आहे. पर्जन्यकाळांत ह्या नदीच्या पुराच्या जोराने है खिंडार स्वच्छ धुऊन जाते;आणि त्याजमधील मोडलेल्या इमारतींचे सांठे त्यांचे पाये, दगडाच्या मर्ति, शिवालिंग, मंदिरांचे व देवळांचे चौथरे उघडे पडतात. ह्याप्रमाणे चार पांच मैल लांबपर्यंत ह्या खाणाखुणा दृष्टीस पडतात. ह्यावरून ते शहर विद्यमान स्थितीत फारच मोठे असावे असे दिसते. ह्या खिंडाराच्या पलीकडे एक तलाव आहे. ह्या खिंडारांत जी कित्येक शिवलिंगें सांपडली आहेत त्यांस ब्राह्मणांनी आलीकडे अनेक नांवें दिली आहेत.त्यांत कोणाचें नांव बुद्धेश्वर,कोणाचे नांव रत्नेश्वर,अशा प्रकारची ती आहेत. ह्या शिवलिंगांपुढे तुटकेफुटके व भंगलेले नंदीही ठेविलेले आहेत. बल्लभीपरच्या खिंडाराप्रमाणे गुजराय,काठेवाड, मारवाड, वगैरे प्रांतांतून पर्वीच्या अनेक शहरांची कित्येक भयाण व ओसाड खिडारें पडली आहेत. बडोद्यापासून सुमारे दहा कोसांवर पंचमहालाच्या हहीत पावागड नावाचा एक किल्ला आहे. ह्या गडाच्या पायथ्याशी व माध्यावर पूर्वी मोठमोठ्या वस्त्या होत्या. त्या एकंदर वस्त्यांचे नांव पूर्वी चांपानगर असे होते. ह्या सर्व वस्या हल्ली जमीनदोस्त झाल्या आहेत. तरी पूर्वीचे तलाव, देवळे वगैरेंच्या खुणा अद्यापि दिसतात ; व त्यांवरून त्या वस्त्यांपैकी प्रत्येक वस्ती निदान पांच पांच कोस तरी लांब असावी असे वाटते. ह्या गडाखाली हल्ली चंपकेश्वर नावाचे एक शिवलिंग आहे. त्याचप्रमाणे कडीजवळ मुंढेरा ह्मणून एक गांव आहे, तेथे पूर्वी टोलेजंग वस्ती असावी असे , हल्ली जी जुनी कुंडे, हात हात लांबीच्या विटा व कोरीव लेख वगरे सांपडतात, त्यांजवरून अनुमान आहे. ह्या गांवचे मुंढेरामाहात्म्य ह्मणून एक पुस्तक आहे. या मुंढेरा गांवांतच मोढ वाणी व मोढ ब्राह्मण यांची उत्पत्ति झाली असे ह्मणतात. याच प्रमाणे वडनगर, झिंझुवाडा, उमई, विसनगर ही शहरेही पूर्वी फार मोठी होती. वर लिहिलेल्या शहरांच्या माहितीची निरनिराळी पुस्तके आहेत. वडनगराच्या माहितीचे जे पुस्तक आहे त्यास नागरखंड असे नांव आहे. पावागड नांवाचा एक किल्ला आहे, ह्मणन वर एके ठिकाणी सांगितले आहे, त्या पावागड किल्लयाच्या वर्णनाचे जे पुस्तक आहे, त्यास पावकाचलमाहात्म्य असें नांव आहे. अशा प्रकारे सर्व हिंदुस्थानांत प्राचीनकाळी फार मोठमोठाली शहरे होती. या शहरांपैकी कित्येक शहरें तशाच