पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) रशियाचे सरहद्दीवर जानीया वगैरे देशास गुर्जरस्थान असे नांव आहे.त्या गुर्जरस्थानांतले हे मूळचे रहिवासी ह्मणून या लोकांस“गुजर हे नाव पडले असावे असे वाटते. गजर लोक प्रथम पंजावांत आले,नंतर मारवाडांत आले व त्यानंतर गजराथेत उतरले. गजर लोक गुजरात आल्यावर त्यांनी तेथे वस्ती केली, तेव्हापासूनच त्या प्रांतास "गुर्जर"अशी संज्ञा मिळाली. हे- गजर लोक हल्लौं हरिद्वार, पंजाब, दिली, मथुरा वगैरे प्रांती पुष्कळ आहेत. जैनसाधूनी बहुत लोकांस जैनमतदीक्षा दिली. त्यांत त्यांनी गुजर लोकांस ओढले होते. हे जैन साधु कोणाला आपल्या धर्माची दीक्षा देतांना जातिभेदाचा विधिनिषेध मानीत नसत, असे मार्गे एके ठिकाणी कळविलेच आहे. गुजर लोकांनी आपले शस्त्रयारित्वाचे ब्रीद सोडून ते व्यापार करू लागले. तेव्हां त्यांस पुढे वणिक अथवा वाणी असे नांव पडले. गुजराथेतील व मारवाडांतील वाण्यांची पटावळी पाहिली तर तीत क्षत्री पुष्कळ आहेत असे आढळते. अमबादचे नगरशेट, प्रेमाभाई वगैरे श्रीमान् लोक ओसवाळ जातीचे क्षत्री असन, ते हल्ली आपणास वाणी म्हणवितात. त्याचप्रमाणे भाटे व लषाण लोक हेही क्षत्री असून, हल्ली वाणिज्य करितात. भाटी क्षत्री अद्यापि राज्यपदी आहेत. वाणी लोकांमध्ये ८४ जाति आहेत; परंतु या सर्व जातींचा एकत्र पंक्तिव्यवहार होतो. या सर्व जातीत ओसवाल जाति श्रेष्ठ आहे. ही ओसवाल जाति पाटणच्या रजपूत लोकांतून निघाली आहे. ओसवाळ जातीमध्ये वडील मुलाच्या नावापुढे "पाल" असे पद लावण्याची चाल आहे. जसें:--राजपाल,वीरपाल, धनपाल, जयपाल इत्यादि. याचप्रमाणे पाटणच्या सोळंखी वंशांतही अशा प्रकारची नांवें आढळतात. वाण्यांमध्ये गुजर वाणी ह्मणून एक जात आहे, त्या जातीतील जे लोक तेच गुजर लोक असतील.हे गुजर लोक फक्त वाण्यांमध्येच आहेत असे नाही. तर, सुतार, कुंभार, वगैरे जातीतही ते आहेत. असो. वल्लभीपूरचें खिंडार अद्यापि जसेंचे तसेंच कायम आहे. त्या खिडारातन आसपासचे लोक आपणास लागतील तसे दगड, विटा, वगैरे सामान खणन नेतात. ह्या खिंडारांतून सांपडणान्या विटा हातभर लांब, दहा तस रुंद व तीन तमू जाड अशा असतात. ह्या खिडारावर हल्ली रान उगवले आहे. ह्याच्या जवळूनच घेलोरी