पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१) धन राजाचा वृतांत लिहिला आहे, त्यांत वरील गोष्टीचा उल्लेख माला आहे. त्यावरून ही गोष्ट खरी असावी अशाविषयी खात्री होते. लोनी मणन एक रोमकपत्तनचा विद्वान् होता, त्याणे असे लिहिले आहे की, भडोचचे बंदरांत ग्रोक ( यवन) व रोमन लोकांची मोठमोठी जहाजें व्यापाराकरितां येत असत, व ती लाखो रुपयांचा माल पश्चिमेकडील देशांत नेत असत. त्यांत स्फटिक, लोखंड, मोती, जवाहोर, विळाचे तेल, मत, कापड, रेशीम, साखर, वंशलोचन, दालचिनी, चंद्ररस, डीक, मिरी, पिंपळी, धूपचंदन, कोष्ठकोलिंजन,जटामांसी, हिरडे, व्याहाडे, आंवळे, गुगुळ, हस्तीदंत, गहू, तांदूळ वगैरे जिन्नस मुख्य असत; आणि रुप्याचे दागिने, सुंदर व तरुण स्त्रिया, तांबें, शिसे, ग्लास, प्रवाल, दारू, छिट, वगैरे पश्चिमेकडील देशांतील पदार्थ इकडे आणीत असत. अरबस्तान व इराणाहून मोती,फेरोजा सोने, खजूर, वगैरे पदार्थ व तिकडील तरुण गुलाम इकडे आणीत असत. हिंदु राजे रूमच्या राजाकडे वकील पाठवीत असत. त्या वकिलाबरोबर एकदां इकटन श्रवणाचार्य नांवाचा एक पंडित तिकडे गेला होता. हा पंडित ग्रीस देशांत आथेन्स शहरी मरण पावला. अयणाचार्याच्या प्रेताचा ज्या ठिकाणी और्ध्वदेोहिक सं. स्कार झाला त्या ठिकाणावर समाधि बांधन, तिजवर असा लेख कोरणा आहे की," श्रवणाचार्य या ठिकाणी निजधामास गेले." चिनी साधच्या बखरीवरून इसवी सन ७०० पर्यंत बल्लभीपूर आबाद होते असे दिसते. परंतु, जैनग्रंथांत वल्लभीपूरचा नाश शिलादित्याच्या कारकीर्दीत झाला असे लिहिले आहे ; तेव्हां, चिनीसाधूनी बखर लि. हिल्यानंतर ते जैनग्रंथ लिहिले गेले असावे असे वाटते. कर्नल टॉड असे ह्मणतो की, बल्लभीपुराचा नाश शकलोकांनी केला; एलफिन्स्टन हा आपल्या इतिहासांत लिहितो की, ह्या नगराचा विध्वंस इराणचा बादशाहा नवषेरवान याणे केला; डा० भाऊदाजींचे समजुतीने चावडे लोकांनी या शहराचा नायनाट केला. डा० भाऊदाजी आणखी असे ह्मणतात की, या चाबडे लोकांनाच 'गुजर' अशी संज्ञा होती; आणि यांच्या अमलांतच तिकडील देशास अथवा मुलखास गुर्जर अथवा गजराथदेश असें नांव पडले. गुजराथ प्रांतास गुर्जर हे नांव सातशे इसवीपूर्वी नव्हते. गुजर लोकांस "गुजर" हे नांव पडण्याचे कारण,