पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) स्वभावाचा आहे तरी याजजवळ विद्वानांची कदर व बज फार अमन, तो त्यांस फार चाहतो; व प्रसंगवशांत वस्त्राभरणांनी त्यांचा सत्कारही करतो. वपटू याची बौद्धधर्मावर विशेष भक्ति आहे. गरीब, भनाय व अंधपंगस धर्म करण्याविषयी त्याचा हात सढळ आहे. त्याची प्रजा खाऊन पिऊन सुखी आहे. सुराष्ट्र देशाची महीनदीपर्यंतची म. र्यादा वल्लभी राजांचे ताब्यात आहे. तीत कित्येक लोक समितीयः मताचे, काही महापान मताचे,व कितीएक आर्य स्थविरमार्ग असे लोक राहतात, त्याचप्रमाणे पाखंड मताचेही लोकांची बरीच वस्ती आहे. सराष्ट्रापासून मवळच उज्जयत (गिरनार ) ह्मणन पर्वत आहे. त्यावर बौद्धमठ आहे. न. त्यांत बौद्ध ऋषि राहतात. गिरनार पर्वतास उज्जयंत हैं नाव पडण्यास जैन ग्रंथांचा आधार आहे. शिवाय, रुदाम्याचे हात. या लेखांतही हे नांव सांपडते. कोठे कोठे गिरनारास गिरिनगर असेही लिहिलेले आढळते. सराष्ट्र देशाची नी राजधानी ह्मणून वर्णिली आहे, ती हल्लीचे जुनागड संस्थान असावे असे वाटते. इसवी सन १०० त फाहहान नांवाचा चीन देशांतला एक साधु हिंइस्थानांत आला होता. त्याने इकडे केलेल्या प्रवासाचे इतिहासाची वखर लिहिली आहे. या चिनी प्रवाशाच्या बखरीचे फ्रान्सांत तद्देशी ह्मणजे फ्रेंच माषेत तर्जुमे झाले आहेत,त्यांवरून त्या काळचा इतिहास समजण्यास चांगले साधन आहे. इसवी सन ७०० त जो विनी साधु हिंदुस्थानांत आला होता, त्याणे महाराष्ट्र. दशांताल चालक्यवंशांत पुलकेशी राजा हा महाशर होता ह्मणून लिहिले आहे. या लेखास आणखीही कित्येक लेख मिळतात. हा साधु कान्यकुब्ज शहरी हर्षवर्धन राजापाशी बरेच दिवस राहिला होता. हर्षवर्धन राजा या साधूला फार मानीत असे,आणि हा साधुही त्या मानाला योग्यच होता. स्याने निरंतर आपल्यापाशी रहावें ह्मणून त्याला राजाने परमावधीचा आग्रह केला ; परंतु, तो ह्मणाला: माझा असा निश्चय झाला आहे की, स्वदेशांत परत जाऊन स्वदेशबंधंस मोक्षमार्गाचा उपदेश करावा व ह्या माझ्या परोपकारोद्देशास, आपण मला येथे राहण्याचा आग्रह करून व्यत्यय आणू नये. हर्षवर्धन राजास हे त्याचे बोलणें मानवन त्याने त्यास काश्मीरपर्यंत पोंचते केले. बाणभट्टाने श्रीहर्षचरित्रांत हर्षव