पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) नान ह्या म्हणजे कल्पसूत्र ग्रंथाचे प्रसिद्ध रीतीने पारायण करविले. कचित् ठिकाणच्या ताम्रपटांत आढळणारा जो ध्रुवसेन तो हाच होता, की दुसरा कोणी होता, हे समजत नाही; परंतु कल्पसूत्र ग्रंथाच्या पारायणानंतर वल्लभीपुर नगर होते असें वल्लभीपूरचे राजाच्या हातचे ताम्रपट सांपडले आहेत, त्यांजवरून दिसते. इसवी सन ७०० त झएनत्संग नांवाचा चिनी जातीचा साधु हिंदस्थानांत आला होता. त्याने वल्लभीनगर पाहिले होते. ह्युएनत्संग हा काबुलाकडून हिंदुस्थानांत आला ; आणि त्याणे सतरा वर्षे ह्या देशांत तर्थिप्रवास केला. त्याने काश्मीर, मगधदेश, कांची, मलबार, पंजाब, अयोध्या, कनोज, काशी, गया, पटणा, मथुरा, राजगृही, अंग, वंग, कामरूप, ब्रह्मपुत्रानदीचे तीरचा सर्व प्रदेश, तेलंगण, आंध्र, सप्तगोदावरी, वगैरे ठिकाणी काही काही दिवस राहून प्रवास केला. हा प्रवास करीत असतांना त्याने संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्याने पाणिनीचे व्याकरणावरही पुष्कळ परिश्रम केले होते व त्याला ते चांगले अवगतही झाले होते.याने बौद्धमताचा त्रिपीठिका ग्रंथ वाचला होता.त्रिपीठिका ग्रंथ झणजे सूत्र, विनय आणि अभिधर्म ह्या तिन्ही विषयांचे ज्यांत विवेचन केलें आहे, तो ग्रंथ. त्याने मोठमोठ्या पंडितांच्या व विद्वानांच्या भेटी घेऊन यांजपासून उपयुक्त गोष्टींची माहिती करून घेतली. हा बौद्धधर्माचा मोठा केवारी होता व म्हणूनच त्याची त्या धर्मावर श्रद्धाही पूर्ण होती. त्याला बौद्धधर्माची ज्या मानाने श्रद्धा व कैवार ही होती,त्या मानानेच त्या धर्माची पूर्ण माहितीही होती, व त्याची ही स्वधर्मप्रवीणता, त्याने जे बौद्धधर्मावर कित्येक ग्रंथ लिहिले आहेत, त्यांवरून प्रत्ययास येते. याचा मुख्य कटाक्ष अहिंसाप्रतिपादनावर फार असून, तो त्याच्या धर्ममताला अनुरूपच होता. त्याने योगशास्त्राचाही अभ्यास केला होता. घएनत्संगाने आपण केलेल्या हिंदुस्थानच्या बखरीत एके ठिकाणी असे लिहिले आहे की," वल्लभीपुरांत बौद्ध साधूचे शमर मठ होते; व त्या मांत मिळून एकंदर सहाहजार साधु रहात होते.बुद्ध जेथे जेथे गेला तेथे तेथें अशोक राजाने स्तूप बांधले आहेत. सराष्ट येथील हल्लीचा राजा क्षत्रिय आहे. त्याचे नांव हापट असे आहे. हा राजा भतिशय रागीट व क्रूर आहे. अशा प्रकारे तो वाईट