पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

UMLReio (२८) तिची मनीषा पूर्ण केली. राजाचे हे जुलमी वर्तन सावकारास सहन न होऊन, तो म्लेंच्छ राजाकडे गेला, व त्यास एक कोटि रुपये देण्याचे कबूल करून, यानपामन साह्यार्थ त्याचे सैन्य घेऊन, राजाशी युद्ध करण्याकरितां आला. म्लेंच्छांचे सैन्य पाहण्याबरोबर नागरिक जन भय. भीत होऊन आपली मुलेमाणसें व मालमत्ता घेऊन श्रीमालपुर, प्रभास, पटण, वर्धमाननगरी म्हणजे हल्लीचे वडवाण, पंवासर वगैरे शहरी पळून गेले. याप्रमाणे नागरिक जनांनी पोबारा केल्यामुळे म्लेंच्छ सैन्याची चांगलीव पोळी पिकलो. म्लेंच्छ फौज शहरांत शिरून तिने त्यांतील पाण्याची कुंडे बाटविली, मनसोक्त लुटालूट केली, व शिलादित्यास ठार मारिले. याप्रमाणे वल्लभीपुरनगरीची व तिचा राजा शिलादित्य याची इतिश्री झाली. दुसरे एके ठिकाणी अशी कथा आहे की, धुंडिमल्ल नांवाचा एक साधु वल्लभीपुर नगरांत भिक्षेकरितां आला असता त्यास भिक्षा मिळाली नाही. तेव्हां सा साधुला कोप येऊन त्याने त्या कोपावेशांत शाप दिला की," हे नगर नाहीसे होवो!" याप्रमाणे त्या साधूच्या तोंडातून शापाक्षरें निघतांच पृथ्वीने तें नगर आपल्या उदरांत घेतले. वल्लभीपुर नगरीच्या आसपासची जी जी गांवें म्लेंच्छ, यवन वगैरे लोकांनी काबीज केली तेथे तेथे वल्लभीपुर नगरीच्या नाशाविषयी वर लिहिज्याप्रमाणे काही तरी दंतकथा ऐकण्यात येतात. आणखी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, वल्लभीपुर नगरीजवळ चपानगरी नांवाचे एक मोठे शहर होते. या चपानगरीत कालिका देवीचे स्थान होते. प्रसंगबात कालिका देवीला क्रोध येऊन, तिने वल्लभीपुर नगरीचा नाश केला. पण वडाची साल पिंपळाला लावून, त्याला आंबा झणण्यांत जितका अर्थ आहे, तितकाच ह्या दंतकथांत आहे! अस्तु . म्लेंच्छांनी बलभीपूरचा नाश केला ह्मणन वर लिहिलेच आहे. हा नाशकाल कोठे इसवी सन ३१५, कोठे ४२०आणि कर्नल टॉड यांनी तर ६२६ लिहिला आहे. ही कालाची भिन्नता कशी झाली है समजत नाही. जैन लोकांचा कल्पसूत्र नांवाचा एक ग्रंथ आहे, त्यांत असे लिहिले आहे की, महावीर स्वामीचे निर्वाणानंतर ९९२ वे वर्षों म्हणजे इसवी सन १६५व्या वर्षी आनंदपूर ह्मणने बढवाण येथें ध्रुवसेन रा.