पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७) भाच्याचा निरोप मानवून त्याने लागलीच बौद्ध साधंची सभा भरवून तीत मल्लाला मोठ्या सन्मानाने बोलावून आणिलें. मल्ल सभेत आल्यावर त्याचा व बौद्ध साधूंचा वादविवाद होऊन, मल्लाने बौद्ध साधंस कुटित करून पराभूत केले. बौद्धसाधूनी आपला पराभव झाला असे पाहून शिलादित्याचे राज्यांतून आपला गाशा गुंडाळला. बौद्ध साधूंशी झालेल्या वाग्युद्धांत यशस्वी झालेल्या मल्लास जैन साधंनी श्रीमलसुरी असा किताव दिला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मलाने शत्रुज क्षेत्राची पुनःप्रतिष्ठा केली; व नंतर तो स्तंभतीर्थाप्त म्हणजे खंबाइतास गेला. मल्ल खवाइतास जाण्याचे पर्वीच अभयदेवसरी नांवाच्या जैन साधने तेथे जैनांचे क्षेत्र व मठ स्थापिले होते, असे नैनग्रंथांत लिहिले आहे.. शिलादित्याच्या कारकीर्दीत बल्लभीपूर नगरीचा नाश होऊन ती रसातलास पोचली असे जैन ग्रंथकार लिहितात. हे नगर काठेवाडांत वळागांवानवळ चामर्डीचे डोंगराजवळ होते, व त्या ठिकाणी त्या वेळचे जुने पाये पजनी घरे अद्यापि सांपडतात. या शहराच्या नाशाचे कारण असे लिहिले आहे की, मारवाडांत पाली मणन एक मोठे शहर आहे. तेथील राहणारा कालीम नावाचा एक मोठा श्रीमान् व्यापारी प्रारब्धाच्या प्रतिकल गतीने दरिद्रो स्थितीस पोंचल्यामुळे तो आपले पाली नगर सोडून बल्लभी नगरांत येऊन राहिला. तेथे. उदरनिर्वाहाची काही तरी सोय पाहिजे ह्मणून त्याणे रोजगारधंदा आरंभिला. दैवशात त्याणे आरंभिलेल्या रोजगारांत त्याला चांगली किफायत होऊन,तो मोठ्या पतीचा सावकार बनला.ईश्वराच्या दयेने झणजे प्रारब्धाच्या अनुकूलतेने त्यास चांगले दिवस आले. तेव्हां, आतां परगहवासाचे द:ख का भोगावे, असे त्याने मनांत आणन, एक सुंदर व भव्य असें घर बांधले. ह्या घरांत त्याची मुलगी एके दिवशी सोन्याच्या फणीने केशसमाजन करितांना तिला शिलादित्याच्या मुलीने पाहिले. तेव्हा राजकन्येला सोन्याच्या फणीची इच्छा होऊन, तिने सावकाराच्या मुलीपासून ती फणी घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सफल झाला नाही. तेव्हा तिने ही गोष्ट आपल्या बापास कळवून, सोन्याच्या फणीची इच्छा दर्शविली. राजानेही पुढचा मागचा विचार न करितां व आपली योग्यता मनांत न आणितां, सावकाराच्या मुलीपासून ती फणो जवरदस्तीने हिरावून घेतली; व ती आपल्या कन्येस देऊन,