पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमची इच्छा आहे. तर तुझी परवानगी असावी. बौद्ध साधूंनी आणखी असे सांगितले की, आमां उभयतांत होणाऱ्या वादविवादांत ज्याचा पराभव होईल त्यास तं आपल्या राज्याचे हद्दपार करावें. बौद्ध साधूचे हे बोलणे शिलादत्यास मान्य होऊन, त्याने जैनधर्मशास्त्रज्ञ अशा लहान थोर सर्व जैन साधूची एक टोलेजंग समा भरविली; आणि तीत चौद्ध साधूस पाचारण करून वादविवाद करण्यास आज्ञा दिली. उभयतांची भवति न भवात होतां होतां अखेरीस जैन साधूंची पिच्छेहाट झालेली पाहून शिलादित्याने ठरल्याप्रमाणे त्यांस आपल्या राज्याचे हद्दपार करण्याचा हुकम फेला; आणि आपण बौद्धधर्मानुयायी झाला. शिलादियाची एक. बहीण भडोचच्या राजास दिली होती. तिला मल्ल नांवाचा एक पुत्र होता. हा मल्ल अप्रतिम रूपसंपन्न होता असे ह्मणतात. मल्लाचा वाप परलोकवासी झाल्यावर त्याच्या आईने व त्याने जैनधर्माची दीक्षा घेतली आणि दोघेही साधु बनन तीर्थाटनास निघाली. याप्रमाणे ते मातापुत्र तीर्थयात्रा करीत फिरत असतां एके दिवशी मल्लाने आपल्या आईस विचारले की, जैनधर्मशास्त्रज्ञ महासाध श्वेतांबर याची अशी दुर्दशा कशाने झाली? तेव्हा आईने सांगितले बेटा, वीर सरेद्र साध होता तोपर्यंत आपल्या धर्माची मोठी भरभराट व चढती कळा होती; परंतु तो आटपल्यापासून तुझा मातुल जो शिलादित्य यास बौद्ध साधूनी भुरळ घालन शत्रुज क्षेत्र बौद्धांनी हिरावून घेतले. आणि जैन सा देशोधडीस लागन त्यांची दुर्दशा झाली. तेव्हां एकट्या श्वेतांबर साधला कोण विचारतो? त्याचाही विचा-चाची तीच अवस्था झाली ! आईच्या तोंडची ही गोष्ट ऐकून मलाला अतिशय संताप आला, व त्याने बौद्ध सावंस जिंकण्याकरितां विद्याभ्यास करण्याचा निश्चय करून, घोड्याच दिवसांत त्याने आपला तो निश्चय तडीसही नेला.मल्लाने जैन व बौद्ध अशा उभय धर्मांत उत्कृष्ट पारंगतता संपादन करून तो आपल्या मामाच्या राजधानीत आला; आणि शिलादेयास सांगून पाठविले की, मल्ल नांवाचा तमचा भागिनेय (भाचा ) बौद्धमत खंडन करण्याचे इच्छेने आला आहे. तर पूर्वी एक वेळ बौद्ध साधूचे विनंतीवरून जशी तम्ही सभा भरविली होती तशीच पुनः एक वेळ जैन व बुद्ध अशा दोन्ही धर्माचे परस्पर वादविवाद होण्याकरिता सभा भरवावी. शिलादित्याला आपल्या